Monday, February 26

Breaking news : 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज, ‘या’ विद्यार्थ्यांचे चक्क शुल्क झाले निम्मे..

Last Updated on December 14, 2022 by Jyoti S.

Breaking news

राज्य सरकारने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. आता बोर्डाच्या परीक्षे मध्ये देण्यात येणाऱ्या सवलतीच्या गुणांना आधी मोजावे लागणारे 50 रुपयांचे शुल्क कमी करण्यात आले.आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत सवलतीच्या गुणांचा अतिरिक्त लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काव्यतिरिक्त 50 रुपये अधिक आकारले जातील, असं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलं होतं. पण या निर्णयामुळे विद्यार्थी तसेच पालकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला. या मागणीमुळे आता सरकारने हे शुल्क थेट 25 रुपयांवर आणले आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

(Breaking news)या’ विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे गुण..

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये शास्त्रीय कला तसेच चित्रकला क्षेत्रात चांगले गुण मिळवणाऱ्या आणि लोककला प्रकारामध्ये सहभागी खेळाडू, स्काऊट ,एनसीसी, स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांना आता सवलतीचे देण्यात येतात. या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचा निकाल वाढवण्यास हे गुण कामात येत असतात. Jalyukta Shiwar Yojana: जलयुक्त शिवार योजना पुन्हा राबवणार, राज्य मंत्रिमंडळाने घेतले 16 महत्वाचे निर्णय..

विद्यार्थी(Breaking news) सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी शाळा आणि शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव देखील दाखल करतात. परंतु आता सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी फेब्रुवारी ते मार्च 2023 परीक्षेपासून प्रति विद्यार्थ्याचे 50 रुपये शुल्क हे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर करत असताना चलनाद्वारे किंवा रोख रक्कम भरणा म्हणून विभागीय स्तरावर घेण्यात येणार होतं. आता हे शुल्क 25 रुपयांनी कमी करून विद्यार्थ्यांना 25 रुपये भरावे लागणार आहे, असं विधान हे राज्य शिक्षण बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

Comments are closed.