
Last Updated on November 22, 2022 by Taluka Post
जांबुटके शिवारात ७५ झाडे जप्त; वडनेरभैरव पोलिसांची कारवाई होतील
जांबुटके शिवारात टोमॅटोच्या पिकात बेकायदेशीररीत्या लागवड केलेली गांजाची एक लाख 38 हजार 654 रुपये किमतीची 75 झाडे वडनेरभैरव पोलिसांनी कारवाई करून याप्रकरणी पोलिसांनी संशयित शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे.जांबुटके शिवारातील शिवओहळ येथील शंकर बापू बांडे (वय 55) यांच्या शेत गट नं. 72/2 मधील टोमॅटोच्या पिकात गांजाची झाडे लावलेली असल्याची माहिती वडनेरभैरव पोलिसांना मिळताच पोलिसांनी शनिवारी (दि. 19) सायंकाळी घटनास्थळी छापा टाकला. टोमॅटो पिकाच्या आत आडोशाला लावलेली 23 किलो 109 ग्रॅम वजनाची दोन ते चार फूट उंचीची गांजाची ओली झाडे पोलिसांनी जप्त केली. नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरवचे सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे, कारवाई केली.
याप्रकरणी संशयिताविरुद्ध वडनेरभैरव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदवड न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे तपास करीत आहेत. हेही वाचा :श्रद्धा वालकर हत्याकांड : आफताबवर थर्ड डिग्री नको
Comments are closed.