नाशिकमध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभारणार मुख्यमंत्री

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

एमआयडीसी, एसएमई चेंबरतर्फे आयोजित परिषदेत घोषणा
ध्वनिचित्रफितीद्वारे साधला संवाद

नाशिक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासाठी पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देव उद्योगांना चालना देण्यासाठी नाशिकमध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उद्योगासाठी केंद्र नाशकात उभारले जाणे महत्त्वाचे ठरणार असून, अशा अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे औद्योगिक उत्पादनांचे लॉन्चिंग, परिषदा, प्रदर्शन असे अनेक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि एसएमई चेंबर ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील एका तारांकित हॉटेलमध्ये आयोजित एसएमई मैन्युफैक्चरर्स अॅण्ड एक्स्पोटर्स समिटमध्ये मुख्यमंत्री रिद्धि यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे संवाद साधता यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर एसएमई बैंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, एसबीआयच्या महाव्यवस्थापक मेरी सागाया, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे चेअरमन श्रीराम महानकालीवार, एसएमईच्या उपमुख कार्यकारी अधिकारी दीली पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,

नाशिक जिल्ह्यात उद्योग कृषी क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण प्रयोग राबविण्यात येत आहेत. उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या भांडवली येथील लोकामध्ये उद्यमशील मानसिकता उपलब्ध आहे.

news on whatsapp 1 Taluka Post | Marathi News

लॉजिस्टिक पार्क, इलेक्ट्रिकल हवला चालना

लॉजिस्टिक पार्क, एक्झिबिशन सेंटर्स, इलेक्ट्रिकल हब, इंडस्ट्रियल पार्क या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना जागा वाटप प्रक्रिया जलद व सुलभतेने करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांत शासनस्तरावर उद्योगवाढीसाठी पायाभूत सुविधा, उद्योगातील गुंतवणूक व रोजगार वाढीसाठी मोठे प्रयत्न करण्यात येत असून, त्यासोबतच पायाभूत विकास प्रकल्पांना वॉररूमच्या माध्यमातून संनियंत्रित केले जात आहे. कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमातून सुमारे सव्वा लाख बेरोजगारांना रोजागार देण्यास प्रारंभ झाला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून दोन लाख कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात येत असून, यातील काही प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत. पुढील काळात 30 ते 40 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात होणार आहे. माहिती व तंत्रज्ञान प्रकल्पात योग्य ते फेरबदल करून त्यांची नव्याने आखणी करण्यात येत आहे. इलेक्ट्रिकल वाहन, कृषी, उद्योग, फुटवेअर, पोलाद, लेदर पॉलिशिंग अशा उद्योग क्षेत्रात साधारण ७५ हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. आठ हजार युवकांना सामूहिक नियुक्तिपत्रे दिली असून, राज्यातील ग्रामीण भागात एक हजार कौशल्य केंद्र उभारली जाणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून अंदाजे २५ हजार उद्योजक एक वर्षांत तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती ही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. हेही वाचा: भगूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद