Last Updated on December 16, 2022 by Jyoti S.
Citylink buses:निमाणीतील वाहतूक कोंडीमुळे परिवहन मंडळाचा निर्णय
सिटीलिक शहर बससेवेअंतर्गत
अनेक बसेस निमाणी(Citylink buses) बसस्थानकातून सोडल्या जातात. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने निमाणीतील काही बसेस आता तपोवनातून तसेच जुना आडगाव नाका येथून सोडल्या जाणार, असा निर्णय नाशिक महानगर परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार तपोवनातून ३४, तर आडगाव नाका येथून ६२ बसफेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.
निमाणी बसस्थानक परिसरात दिंडोरी नाका तसेच पंचवटी कारंजा हा वर्दळीचा भाग असल्याने येथे दिवसभर अनेकदा वाहनधारकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. निमाणी बसस्थानकातून बसेस(Citylink buses) सुटल्यानंतर या भागातील चौकातून रस्ता ओलांडताना बराच वेळ वाया जातो. त्यामुळे वेळेची बचत व्हावी आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सिटीलिक शहर बसेस तपोवन तसेच जुना आडगाव नाका येथील शहर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाने ६२ बसफेर्यांना पंचवटी डेपो कॉर्नर (जुना आडगाव नाका) येथे टर्न दिला आहे, तर ३४ बसफेर्या तपोवन डेपो येथे हलविण्यात आल्याने या बसेसचे(Citylink buses) किमी वाढून त्याचा आर्थिक फटका सिटीलिंकला सहन करावा लागत आहे. प्रवासी आणि नाशिककरांच्या सोयीसाठी सिटीलिंक प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, त्याचा कोणताही भार सिटीलिंकने प्रवासी भाड्यावर लादलेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.हेही वाचा: kites : नाशिककरांना ‘पुष्पा’ पतंगची भुरळ
सिटीलिंक बसेस फेरनियोजनाचे मार्ग मार्ग क्रमांक १०१ अ, १०२ब, १०६ अ, १०९ अ, १११ब, १२८ अ, १२९ अ १३० अ असे हे ८ मार्ग असतील. त्याचप्रमाणे १०१, १०२, १२९ अ, १३० अ या चार मार्गावरील ३४ बसफेऱ्यादेखील तपोवनात हलविण्यात आलेल्या आहेत. या बसेसदेखील निमाणी येथे न येता दुसर्या मार्गानि तपोवनात जातील व तेथूनच मार्गस्थ होतील.