
Last Updated on October 4, 2023 by Jyoti Shinde
Cloud Burst Sikkim
नाशिक : ढगफुटीमुळे सिक्कीममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर सिक्कीममधील लोनाक सरोवरावर ढग फुटल्याने तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पुरात लष्कराचे २३ जवानही बेपत्ता झाले आहेत. या जवानांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.Cloud Burst Sikkim
थोडं पण महत्वाचं
पूरस्थितीनंतर चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यानंतर सखल भागातील पाणीपातळीही 15 ते 20 फुटांनी वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांगमध्ये लष्कराची वाहने वाहून गेली. यासोबत 23 जवानही बेपत्ता आहेत. या बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.
तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सिक्कीममध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे सिक्कीममधील सिंगथम फूटब्रिजही वाहून गेला आहे. तसेच जलपाईगुडी प्रशासनाने तिस्ता नदी परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. सर्वांना सतर्कही करण्यात आले आहे.