
Last Updated on January 26, 2023 by Jyoti S.
Cold Wave in Maharashtra: हवामानाचा अंदाज काय आहे?
महाराष्ट्रात थंडीची लाट(Cold Wave in Maharashtra) : मुंबईसह कोकण भागात सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत सध्या कोकणातील कमाल तापमानात घट झाली आहे. राज्यात सकाळचे तापमान 15 ते 19 अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे.
nashik : राज्यात थंडीचा प्रकोप वाढला असून येत्या काही दिवसांत गारपीट वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरण्याची शक्यता आहे. थंडीची ही लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप वाढत आहे. जम्मू-काश्मीर बर्फाने झाकले आहे. याशिवाय पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीचा प्रकोप वाढणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईतील किमान तापमान सरासरीच्या खाली जाऊ शकते. ३० जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट होईल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. गुजरातमधून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा पालघर, उत्तर मुंबई आणि ठाणे या भागांना अधिक फटका बसतो.
अफगाणिस्तानवर थंडीची(Cold Wave in Maharashtra) लाट पसरली असून ती पूर्वेकडे सरकत आहे. राजस्थानच्या नैऋत्य भागात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारतातील इतर राज्यांवरही परिणाम होत आहे. 27 जानेवारीनंतर काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ होईल. मात्र, दिवसाच्या तापमानात किंचित घट होऊ शकते.
हेही वाचा: Gold Rates : सोन्याचा भावात घसरण!! जाणून घ्या काय आहे आजचे दर!!
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये अजूनही थंडी गोठवणारी आहे. 26 जानेवारीपर्यंत राज्यातील इतर भागात थंडीची लाट ओसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, नव्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा वाढ(Cold Wave in Maharashtra) होणार आहे.