
Last Updated on November 20, 2022 by Taluka Post
कुशल मनुष्यबळासाठी पुढाकार घेणार : तडवी
अंबड : नाशकातील औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना आवश्यक असलेले कुशल कामगार उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच त्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम विविध शैक्षणिक संस्थांकडून तयार करून घेण्यास आपण पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास आणि उद्योजक मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त ए. एल. तडवी यांनी केले.
नाशकातील औद्योगिक वसाहतीतील
उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, कुशल कामगारांचा असलेला तुटवडा, कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी सर्टिफिकेट अभ्यासक्रम राबविणे यासाठी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पुढाकाराने आयमाच्या सभागृहात विविध अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनविषयक महाविद्यालयांचे प्राचार्य आणि त्याच्याशी निगडित संस्थांच्या मान्यवरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तडवी बोलत होत्या. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, उद्योग व संस्था संवाद समितीचे चेअरमन जगदीश पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सहसचिव गोविंद झा, हर्षद बेळे, कुंदन डरंगे, जयंत पगार आदी उपस्थित होते.
औद्योगिक संस्था, महाविद्यालये व संस्थांद्वारे कर्मचारी व कामगारांचे ज्ञान मूल्यमापन करणे, उद्योगातील प्रॅक्टिकल अॅक्टिव्हिटीवर आधारित अभ्यासक्रम तयार करणे, कर्मचारी व कामगारांमध्ये कौशल्य संपादनाबाबत जागरूकता निर्माण करणे, कर्मचारी व कामगारांसाठी कौशल्य विकासावर भर देणे, ज्यांचे शिक्षण 10वी अथवा 12वीपेक्षा कमी आहे, अशा कर्मचारी व कामगारांसाठी डिप्लोमा(Diploma) आणि पदवी अभ्यासक्रम तयार करणे, कर्मचारी व कामगारांना सैद्धांतिक शिक्षणा साठी पायाभूत सुविधा प्रदान करणे, उद्योगाच्या मागण्या आणि ट्रेंडवर आधारित अभ्यासक्रमाची रचना करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली आहे .हेही वाचा: नाशकात ६ डिसेंबरपासून कृषी महोत्सव
Comments are closed.