
Last Updated on November 22, 2022 by Taluka Post
लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक
लासलगाव : कांद्याच्या उत्प भावात सातत्याने घसरण होत असल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी १२ सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव अर्धा तास बंद पाडले. कांद्याला 30 रुपये प्रतिकिलो भाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. वाढत मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिला
सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात कांदा लिलावास सुरुवात झाली. मात्र सतत कांद्याला 10 ते 12 रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने कांद्याच्या भावात घसरण होत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखून धरले . दिवाळीनंतर कांदा बाजारात लिलाव करी सुरू झाल्यावर १ नोव्हेंबर रोजी कांद्याला किमान 1000 सरासरी 2900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून कांद्याला किमान 500 तर सरासरी झाले 1400 रुपये प्रतिक्विंटल भाव कमी मिळत असून, सरासरी भावात 1070 रुपयांची घट झाली आहे. या भावात उत्पादन खर्चही भरून निघणार नाही या कारणामुळे शेतकरी संतप्त झाले व त्यांनी काल लासलगाव मध्ये लिलाव बंद पाडले. कांद्याला भाव कमी मिळत असल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. इतर राज्यांमध्ये स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावात घसरण होत असल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली आहे.हेही वाचा :फळ बाजारात सफरचंदाचे वर्चस्व!