लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री

Last Updated on November 26, 2022 by Taluka Post

कराड (सातारा) उद्योग, कृषी क्षेत्राचा जेव्हा विकास होतो, तेव्हा तळागाळातील सामान्यांना त्याचा लाभ होतो. त्यामुळे आम्ही प्रत्येक कॅबिनेटला एकतरी जलसिंचन प्रकल्प मंजूर करतो. प्रलंबित प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देत आहोत. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कराड दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कराडच्या कृषी प्रदर्शनात प्रगतशील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जे आमूलाग्र बदल घडवलेले आहेत, त्याचे प्रदर्शनातून दर्शन घडले. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे, त्यांना त्यांच्या मेहनतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम केले आहेत. येथे माणमध्ये सफरचंदांची शेती केलेली आहे. उद्योग विभागाने ५०० एकरमध्ये अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज पार्क उभे केले असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

कराडचे विमानतळ एमएडीसीकडे असून, ते एमआयसीकडे वर्ग करून लवकरात लवकर नाईट लैंडिंग सुरू होईल. राज्याला विकास निधी देतो तो यापुढेही कमी पडू देणार नाही. मी काही बोलतो, बघतो, करतो असला मुख्यमंत्री नाही. जे काही होणार आहे ते पटकन करतो. राज्यात विकासकामामध्ये कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. शेवटी सर्वसामान्यांचे हे सरकार आहे, असे ते म्हणाले. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान किंवा तुलना कोणीही करू शकत नाही. कोणाच्या अशा विचारांशी आम्ही सहमत नाही. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. आमची भूमिका लपून छपून नसते. आमची भूमिका उघड असेत. ३-४ महिन्यांमध्ये आम्ही घेतलेले निर्णय लोकहिताचे आहेत. आमचा वैयक्तिक कोणताही अजेंडा नाही. जे आम्ही करतोय झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अकराशे जागांपैकी सातशे जागा मिळवल्या आहेत. संजय राऊत हे महान नेते आहेत. हात दाखवण्याची मला गरज नाही, बदल घडवण्यासाठी मनगटामध्ये ताकद असायला हवी. ते बळ बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिले आहे. ३० जूनला आम्ही ते दाखवून दिले आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.

आम्ही गुवाहाटीला जाणार आहोत, तेथील मुख्यमंत्र्यांचे आम्हाला आमंत्रण आहे. कामाख्या देवीचे जागृत देवस्थान आहे. तेथे आम्ही ५० जण जाणार आहोत. गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गुजराती नागरिकांना मतदान करता यावे यासाठी सरकारने राज्यातील चार जिल्ह्यांत मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. मात्र या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नसून, सुट्ट्या दिल्या नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पंढरपुरातील लोकांना ल विश्वासात घेऊ

पंढरपूर येथील कॉरिडॉरला विरोध करत तेथील व्यापाऱ्यांनी ‘तो रद्द नाही झाला तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पूजेला बोलवू?’ असा इशारा दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, तेथे लाखो भाविक भेट देतात. त्यांचा विकास करणे आवश्यक आहे. त्याचा आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. तेथील लोकांना विश्वासात घेऊन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांना विश्वासात न घेण्याची भूमिका आमच्या सरकारची नाही.

बातम्या,महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?