Last Updated on December 15, 2022 by Taluka Post
Fresher Job: फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी, अॅमेझॉन कंपनीमध्ये बंपर पदभरती सुरु..?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
Fresher Job: सध्या जागतिक मंदीची लाट आल्याने अनेकांच्या नोकऱ्यांवर गडांतर आले आहे. ट्विटर, मेटासह अॅमेझॉनने हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. जगात अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असताना, भारतात नोकऱ्यांचा महापूर आलाय. त्यात आता अॅमेझॉनची भर पडली आहे.
अॅमेझॉन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी असून, ई-कॉमर्ससह क्लाउड कम्प्युटिंग, ऑनलाइन जाहिराती, डिजिटल स्ट्रीमिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. जगातील सर्वांत प्रभावशाली कंपन्यांमध्ये अॅमेझॉनचा समावेश होतो. या कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला आहे.
अॅमेझॉन कंपनीने आपल्या चेन्नईतील कार्यालयात ‘डिव्हाइस असोसिएट’ पदासाठी नोकर भरती करीत आहे. त्यासाठी बीई/बी टेक/ एमसीए/एमएस्सी पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठी किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. मात्र, फ्रेशर्स उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
भरतीसाठी पात्रता
अर्जदाराने बीई आयटी, ईसीई आणि ईईई, बीटेक, बीएस्सी किंवा विज्ञान व अभियांत्रिकीसारख्या विषयांमध्ये पदवी घेतलेली असावी.
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम व त्याच्याशी संबंधित प्रोग्राम्सची (की वर्ड, एक्सेल, इंटरनेट एक्सप्लोरर, फायर फॉक्स) ठोस माहिती असावी.
जुळवून घेण्याची, नियमित अॅक्टिव्हिटीज करण्याची क्षमता असावी.
पुढाकार घेण्याची वृत्ती, जबाबदारी घेण्याची वृत्ती, स्वयंप्रेरित असणं आणि डेडलाइन(Dedline) पूर्ण करण्याचं आव्हान पार करण्याची क्षमता असली पाहिजे.
कोणत्या जबाबदाऱ्या असतील..?
▪️ योग्य कार्यक्षमतेची हमी देण्यासाठी सॉफ्टवेअर, हार्डवेअर चाचण्या करणं. अद्ययावत सराव चाचण्या व प्रक्रियांचे मूल्यांकन करणं. ज्ञान व सर्वोत्तम पद्धती शेअर करणं. अॅपची(App) फीचर्स आणि कार्यक्षमतेची सखोल तपासणी करणं.
▪️ गुणवत्ता आणि उत्पादकता पातळीत नियमितपणा राखणं. आउटपुटच्या (Output)बाबतीत शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट मानकानुसार दररोज नियमित कामं करण्याची क्षमता पार पाडणं. चाचणी प्रक्रिया किंवा गुणवत्ता हमी तपासणी चालू असताना आढळलेल्या त्रूटींची नोंद ठेवणे.
▪️ एसएलएनुसार प्रगतीचं निरीक्षण करणं. मानवी श्रम, तसेच कोणतंही आवश्यक सॉफ्टवेअर व हार्डवेअर आवश्यक असलेली डिव्हाइसेस आणि चाचणी पद्धती अंगीकारण्यास सक्षम असणं. इंग्रजीचे व्याकरण, वाक्यरचना आणि शब्दसंग्रह आवश्यक.
▪️ पडताळणी, विश्लेषण आणि डेटा संकलनाच्या उद्देशासाठी नियमितपणे सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्सची नियुक्ती करण्यास सक्षम असणं. प्रगतीचा अहवाल देणं, समस्या कम्युनिकेट करणं आणि अडचणी मांडणे.
हेही वाचा: UPSC IAS परीक्षा: UPSC मुख्य परीक्षेत या 10 विषयांची यशाची टक्केवारी सर्वाधिक आहे