खुशखबर सर्वात मोठी भरती : नाशिक झेडपी फेब्रुवारीत भरणार 2 हजार जागा

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

नाशिक : ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट क संवर्गातील रिक्त जागांपैकी 80 टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक(schedule) जाहीर केले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट क संवर्गातील 2538 रिक्त जागांच्या 80 टक्के म्हणजे ? 2030 जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार (schedule) एक ते सात फेब्रुवारी दरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहेत .

नाशिक जिल्हा (Nashik) परिषदेने रिक्त जागांचा अंतीम आराखडा राज्य शासना कडे पाठवला असून त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये सर्व विभागांच्या गट ड व गट क या संवर्गाच्या 2 हजार 726 जागा रिक्त आहेत. यामध्ये 2 हजार 538 जागा या गट क मधील आहेत, तर 188 जागा गट ड मधील आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील जागा भरणार आहे. त्यात राज्यातील जिल्हा परिषदांमधीलू 6 हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील गट क संवर्गातील रिक्त जागांच्या 80 टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण 2726 जागा रिक्त असून त्यात गट ड मधील 188 जागा रिक्त आहेत. मात्र, ग्रामविकास विभागाने गट ड ची रिक्त पदे भरण्यास अजून परवानगी दिलेली नाही. केवळ गट क संवर्गातील पदांची भरती करायची असल्यामुळे 2538 रिक्त जागांच्या 80 टक्के जागांची भरती प्रक्रिया नाशिक जिल्हा परिषद निवड मंडळाच्या माध्यमातून राबवणार असल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

असे आहे वेळापत्रक

  1. बिंदू नामावली, रिक्त जागांच्या संख्ये नुसार आरक्षण निश्‍चित करणे, भरती प्रक्रिये साठी कंपनी निवड करणे : 31 जानेवारी 2023 पर्यंत
  2. पद भरती जाहिरात प्रसिद्ध करणे :1 ते 7 फेब्रुवारी2023
  3. उमेदवारी अर्ज मागवणे :8 ते 22 फेब्रुवारी 2023
  4. उमेदवारी अर्जांची छान नी : 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023
  5. पात्र उमेदवारां ची यादी जाहीर करणे : 2 ते 2 मार्च 2023
  6. उमेदवारां ना परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध करणे :6 ते 13 एप्रिल2023
  7. परीक्षा आयोजन : 14 ते 30 एप्रिल 2023
  8. निकाल व नियुक्त्या देणे : 1 ते 31 मे 2023

आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी जॉईन वर क्लिक करा .

Comments are closed.