Last Updated on December 16, 2022 by Taluka Post
Government Schema gold: स्वस्तात सोने खरेदीची पुन्हा संधी, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या…!! स्वस्तात सोने खरेदीची पुन्हा संधी, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या…!! ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
Government Schema gold: सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नागरिकांना स्वस्तात सोन्यात(Gold) गुंतवणूक करता यावी, यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर-2015 मध्ये एक योजना सुरु केली होती. ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ अर्थात सार्वभौम सुवर्णरोखे योजना असं या योजनेचं नाव..!! केंद्र सरकार दरवर्षी ‘आरबीआय’मार्फत ही योजना राबवते.
‘सॉवरेन गोल्ड बाँड’ योजनेत गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोनं मिळत नाही, तर केंद्र सरकार डिजिटल स्वरुपात ‘गोल्ड बॉण्ड्स’ विकते. कमी किंमतीत ‘गोल्ड बाॅंड्स’ खरेदी करता येतात. त्यातून चांगला परतावाही मिळतो. शिवाय, सरकारी योजना(Government Schema)असल्याने नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नसते. प्रत्यक्ष सोने खरेदी केल्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. मात्र, गोल्ड बाॅंडमध्ये आकर्षक व्याज मिळते.
केंद्र सरकारने गोल्ड बाॅंड विक्रीच्या आगामी दोन टप्प्यांची घोषणा केली आहे. त्यानुसार, 2022-23 या वर्षातील तिसरा टप्पा 19 ते 23 डिसेंबर दरम्यान, तर चौथा टप्पा पुढील वर्षी 6 ते 10 मार्च 2023 दरम्यान खुला होणार आहे. या टप्प्यातील सुवर्ण रोख्यांची किंमत लवकरच निश्चित केली जाईल.
विशेष म्हणजे, आता ‘डिजिटली’ गोल्ड बाॅंड खरेदी केल्यास, प्रति ग्रॅम 50 रुपयांची सवलत मिळणार आहे. ग्राहकांना निर्धारित बँकांच्या इंटरनेट बँकिंग अथवा प्रत्यक्ष शाखेत किंवा टपाल कार्यालयात हे रोखे खरेदी करता येतील. नागरिकांना किमान 1 ग्रॅम ते कमाल चार हजार ग्रॅम; तर ट्रस्ट व तत्सम संस्थांना 20 हजार ग्रॅम सुवर्णरोखे एका आर्थिक वर्षांत खरेदी करता येतात.
काय फायदा होणार..?
गोल्ड बाॅंडमधील गुंतवणुकीवर दरवर्षी 2.5 टक्के व्याज दिले जाणार असून, ते करपात्र असेल.
मुदतपूर्तीनंतर व्यक्तींना मिळणारा दीर्घकालीन भांडवली नफा पूर्णत: करमुक्त केला आहे.सुवर्ण रोखे कर्जासाठी तारण ठेवता येतात.
सुवर्ण रोखे कर्जासाठी तारण ठेवता येतात.
सुवर्ण रोखे आठ वर्षे मुदतीचे असून, पाच वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
ग्राहकाने ‘डिजिटल’ माध्यमातून बाॅंड खरेदी केल्यास सरकार 50 रुपये सवलत देते.
शेडय़ुल्ड बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ठरावीक निर्देशित पोस्ट ऑफिस आणि मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात बाॅंड विक्रीसाठी उपलब्ध असतील.
हेही वाचा: Today Petrol Rate: पहा आजचे पेट्रोल चे दर कुठे काय भाव आहे ते