Hawaman Update : राज्यात आजपासून थंडी वाढण्याची शक्यता .

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

कमाल तापमान सातत्याने 30 ते 35 अंशांच्या आसपास आहे.

महाराष्ट्राकडे उत्तरेकडील थंडी येऊ लागल्याने राज्यात आजपासून थंडी वाढण्याची शक्यता आहे. ही थंडी पुढील चार दिवस तशीच राहून त्यानंतर गारठा पुन्हा काहीसा कमी होण्याचे संकेत आहे.
पुणे : महाराष्ट्राकडे उत्तरेकडील थंडी (Winter) येऊ लागल्याने राज्यात आजपासून थंडी (Cold Weather) वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ही थंडी पुढील चार दिवस राहून त्यानंतर गारठा पुन्हा काहीसा कमी होण्याचे संकेत आहे. गुरुवारी धुळ्यामधील कृषी महाविद्यालय आणि निफाडमधील गहू संशोधन केंद्रात (Wheat Research Center) राज्यातील नीचांकी 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती .
उत्तरेकडील राज्यांत थंडी वाढू लागली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील हे गार वारे महाराष्ट्राकडे येत असल्या कारणांमुळे राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात पहाटे थंडी आणि दुपारी चटका ही स्थिती कायम राहणार आहे. रात्री उशिरापासून गारठा वाढतच आहे. तर दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊन उन्हाचा चटका जाणवत आहेच . गुरुवारी राज्याच्या किमान तापमानात घट होत तो पारा 11 ते 21 अंशांच्या दरम्यान होता. पुढील चार दिवस किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किमान तापमान कमी होत असतानाच राज्यात कमाल तापमान मात्र सातत्याने 30 ते 35 अंशांच्या आसपास कायम आहे. रत्नागिरी येथे कमाल 35.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्यामध्ये आकाश निरभ्र राहून, कोरड्या हवामानासह, किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार

अंदमान समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली शनिवारपर्यंत आणखीच तीव्र होण्याचे संकेत असूनहि , ही प्रणाली तमिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता वर्तवली आहे. नैॡत्य अरबी समुद्रात विषूववृत्ताजवळ समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे 31.6 (12.9), जळगाव 32.7 (14.5), धुळे 32 (11.5), कोल्हापूर 31.6 (17.1), महाबळेश्वर 27.1(12.8), नाशिक 30.9 (13.9), निफाड 29.6 (11.5), सांगली 32.3(15.8), सातारा 30.7(13.4), सोलापूर 33.4(14.7), सांताक्रूझ 33(20.4), डहाणू 31.6 (20.7), रत्नागिरी 35.2 (20.3), औरंगाबाद 31(12.5), नांदेड 32.4 (18.8), परभणी 31.9 (14.1), अकोला 32.2 (15.2), अमरावती 32.4 (13.8), बुलडाणा 30.2(15.8), ब्रह्मपुरी 32.7 (15.9), चंद्रपूर 29.9 (15.8), गडचिरोली 29.0(14), गोंदिया 30.5(13.5), नागपूर 31.4(14.7), वर्धा 31.2 (14), वाशीम 32.5 (-), यवतमाळ – (12.5)