Last Updated on January 3, 2023 by Jyoti S.
Health care tips: आहार सांभाळणार, व्यायाम करणार हे संकल्प का पूर्ण होत नाहीत?
नवीन वर्ष सुरू झाले की शेकडो लोक शेकडो संकल्प करतात. त्यातही आहार चांगला घ्यावा, व्यायाम करावा असं तर अनेकजण ठरवतात. खरंतर आहार आणि व्यायामाचे महत्त्व अगदी लहान मुलांनाही समजते; पण मग तरी अनेकांचे संकल्प पूर्णच होत नाही, आरोग्याच्या तक्रारी वाढतात, असं का होतं? असे काय आहे जे तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या ध्येयापर्यंत नेईल.
फक्त ३ गोष्टी(Health care tips)
१. सातत्य
आहार आणि व्यायाम हाच आरोग्य संकल्प असेल तर त्यात सातत्य ठेवणे भाग आहे तरच तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम मिळू शकतात.
२. स्वतःला ओळखा..
तुमचे आरोग्य ध्येय काय(Health care tips)आहे हे सगळ्यात ‘आधी ओळखा. उगाचच सगळ्यांनी एका प्रकारचा व्यायाम सुरु केला तर त्याच प्रकारचा तुम्हीही सुरू करायला हवा असे नाही त्यामुळे स्वतःची शारीरिक क्षमता आणि आवड ओळखून त्या पद्धतीचा व्यायाम ठरवावा.’ हेच आहारालाही लागू होते.
किटो, जीएम, क्रश डाएट सुरु करण्यापेक्षा स्वतःची प्रकृती ओळखून त्याप्रमाणे आहार ठरवा. त्यात सातत्य ठेवा. कुठल्या प्रकारचे अन्न खाल्यानंतर त्रास होतो हे प्रत्येकाला माहिती असते. स्वतःचे योग्य निरीक्षण केल्यास सहज समजू शकते.
हेही वाचा: Health tips Guava : थंडीत पेरू खा अन् शुगर नियंत्रणात ठेवा !
३. आरोग्य म्हणजे शरीरासोबत मनाचेही
आरोग्य उत्तम असणे. त्यामुळे फिटनेसबरोबरच त्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. या तीन गोष्टी केल्या तरी आपले यंदाचे आरोग्य संकल्प नक्की पूर्ण होतील.