Last Updated on February 1, 2023 by Jyoti S.
In the new budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पाचवा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
थोडं पण महत्वाचं
या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहे.
देशभरात आता 38 हजार 800 शिक्षकांची भरती होणार आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी 157 नवीन महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. आता या योजनेअंतर्गत गरिबांना 2024 पर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.
– 2027 पर्यंत अॅनिमिया हा आजार मुळापासून समूळ नष्ट करणार असल्याचेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले.
कुठल्या योजनांचा लाभ आपल्याला मिळणार ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा
जुन्या टॅक्स ब्रॅकेटमधील स्लॅब 2.5 लाखांपासून सुरू झाले. आता स्लॅबची संख्या 5 करण्यात आली आहे. नवीन कररचना स्वीकारणाऱ्यांना सात लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही.
जुनी कर रचना काय आहे?
3 लाखांपर्यंत – कर नाही
3 ते 6 लाख – 5 टक्के
6 ते 9 लाख – 10 टक्के
9 ते 12 लाख – 15 टक्के
12 ते 15 लाख – 20 टक्के
15 लाखाच्या वर – 30 टक्के
गोवर्धन योजनेंतर्गत(In the new budget) 500 नवीन ‘वेस्ट टू वेल्थ’ संयंत्रे उभारण्यात येणार आहेत.