बाजार समिती शेतकऱ्यांसाठी खुली; निवडणूक लढवता येणार

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

बळीराजा आता रिंगणात

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

मुंबई :कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीत नाव नसलेला मात्र शेतकरी असलेला सर्व सामान्य बळीराजासुधा बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार आहे. याबाबतचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे . यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न अधिनियमात सुधारणा करण्यास देखील मंजुरी दिली आहे . बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

त्याआधी फडणवीस सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला जाईल असा बहाल केला होता. मात्र त्याआधीच महाविकास आघाडी सरकारने त्यात बदल करत मतदार यादीत असलेल्या शेतकऱ्यांनाच मतदानाचा अधिकार हा पूर्वीचा नियम लागू केला होता.आता मात्र शिंदे-फडणवीससरकारने नवा कायदा करताना मतदारयादीत नसलेला पण शेतकरी असणारा कोणीही व्यक्ती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवू शकतो असा सांगितलं आहे. या सुधारणेमुळे कृषी उत्पन्न वाढणार आहे. या सुधारणे बाजार समितीवर सर्वसामान्य पतसंस्था व बहुउद्देशीय शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे. या सुधारणेमुळे बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच कृषी पतसंस्था व्यवस्थापनावर समितीवरील निर्वाचित सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांनादेखील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविता येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले .

Comments are closed.