मेस्सीचे निवृत्तीचे संकेत

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

दोहा : फुटबॉलवर माझे नितांत प्रेम आहे. खेळाचा आनंद मैदानावर नेहमीच घेतला आहे. जीवनात केवळ फुटबॉलच खेळत आलो. यापुढे जास्त काळ फुटबॉल खेळू शकेन, असे वाटत नाही, अशा शब्दात अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

१९८६ नंतर अर्जेंटिनाची विश्वचषकाची पाटी कोरी आहे. २०१४ मध्ये अर्जेंटिनाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती; पण जर्मनीने बाजी मारली. सात वेळा प्रतिष्ठेचा बलून डे और पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मेस्सी आणि अर्जेंटिना संघाला विश्वचषकाने हुलकावणी दिली आहे. चाळिशीकडे झुकलेल्या मेस्सीची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असण्याची शक्यता आहे. कारकीर्दीतल्या अंतिम स्पर्धेत अर्जेंटिनाला विश्वचषक मिळावा, असा ध्यास मेस्सीने घेतला आहे. अर्जेंटिनाचा स्पर्धेतील पहिला सामना ‘क’ गटातील सौदी अरेबियाशी २२ नोव्हेंबरला आहे. या गटात मेक्सिको आणि पोलंड या संघांचा समावेश आहे.

गोंजालेज, जोक्विन दुखापतीमुळे बाहेर

विश्वचषक सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल असताना अर्जेंटिनाच्या गोटातून चिंतेच बातमी बाहेर आली आहे. स्ट्रायकर निकोलस गोंजालेज व जोक्विन कोरिया या दुकलीला दुखापतीमु विश्वचषकाला मुकावे लागेल. सराव शिबिरात गोंजालेजव्या पायाचे स्नायू आखडले. मात्र जोक्विनच्या दुखापतीबाबत फारशी माहिती देण्यात आली नाही, गोंजालेजच्या स्थानावर अॅटलेटिको माद्रिदच्या आघाडीतील फळीत खेळणारा अँजेल कोरियाला संधी देण्यात आली आहे. जोक्विन बाहेर पडल्यामुळे रिक्त झालेल्या स्थानावर अॅटलांटा युनायटेडचा थियागो अल्माडाची वर्णी लागली आहे. हेही वाचा: बीसीसीआय: टी-२० विश्व कपमध्ये खराब प्रदर्शनाचे परिणाम! चेतन शर्मा की अगुआई निवड समिती बर्खास्त

Comments are closed.