‘नाफेड’च्या अपुऱ्या माहितीवर मंत्री डॉ. पवारांची बोळवण!

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

कांद्याचे भाव पाडून नुकसानीचे प्रकरण

नाशिक, ता. १७ ‘नाफेड’ने खरेदी केलेल्या कांद्यापैकी किती कांदा खराब झाला आणि शासनाचे किती नुकसान झाले, हे महिन्यानंतरही ‘नाफेड’कडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नाफेडच्या कांदा खरेदी तक्रारींच्या अनुषंगाने बैठक घेतली, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, नाफेडचे शैलेशकुमार आदी उपस्थित होते. बैठकीनंतर ‘नाफेड’कडून केंद्रीय मंत्र्यांनाही केवळ कांदा खरेदीचीच माहिती देत बोळवण करण्यात आली.

केंद्र सरकारने ‘नाफेड’च्या माध्यमातून खरेदी केलेल्या दोन लाख ३८ हजार टन कांदा खरेदीदरम्यान भाव पाडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचा प्रकार १० ऑक्टोबरच्या बैठकीत पुढे आला. जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांच्या तक्रारीनंतर केंद्र सरकारने ‘नाफेड’च्या माध्यमातून खरेदी केलेल्या दोन लाख ३८ हजार टन कांदा खरेदीदरम्यान भाव पाडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचा प्रकार १० ऑक्टोबरच्या बैठकीत पुढे आला. जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांच्या तक्रारीनंतर असहकार दर्शवला

माहिती गुलदस्त्यातच

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी (ता. १६) बैठक होऊनही त्यात ‘नाफेड’च्या निष्काळजीपणामुळे किती कांदा खराब झाला, याची माहिती पुढे आलीच नाही. बैठकीत ‘नाफेड’कडून केवळ कांदा खरेदीची माहिती दिली गेली. त्यात ए ग्रेड ७० हजार ४६० टन, तर बी ग्रेड ३३ हजार ३६१ टन कांदा खरेदी करण्यात आल्याचे सांगून ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना कांद्याचे किती नुकसान झाले, याची माहिती न देताच सगळ्यांची बोळवण केली.

कांदा खरेदीविषयी असलेल्या तक्ररीची दखल घेऊनच यात लक्ष घातले आहे. सद्यःस्थितीत त्वरित कांदा वितरण करावे, याला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या राज्यात कांद्याची गरज आहे, त्याच भागात कांदा पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. किती नुकसान झाले, त्यात शासनाचे किती, शेतकऱ्यांचे किती, हा विषय आहेच. केंद्र शासनाच्या संपर्कात राहून फॉलोअप सुरूच राहील.

– डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

हेही वाचा: सोयाबीनचा दर: देशात 145.55 लाख टन सोयाबीनच्या उपलब्धतेचा अंदाज