Last Updated on December 16, 2022 by Jyoti S.
Chandwad: रेल्वेस्थानकावर पोलिसांना आढळली
नाशिकरोड : आई-वडिलांकडून शाळेत जाण्याचा तगादा लावला जातो, म्हणून रागाच्या भरात चांदवड येथून घरातून कोणाला काहीही न सांगता चार दिवसांपूर्वी बाहेर पडलेल्या शाळकरी मुलीला रेल्वे पोलिसांनी पालकांकडे सुपुर्द केले.
चांदवडच्या(Chandwad) सर्वसामान्य शेतमजूर कुटुंबातील पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी ही आई-वडील शाळेत जाण्यास व अभ्यास करायला सांगतात म्हणून शहरात काहीतरी काम धंदा करून आई-वडिलांना मोठे दाखविण्याच्या इराद्याने चार दिवसांपूर्वी मुलीने घर सोडले. घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झालेल्या मुलीमुळे आई, वडिलांसह नातेवाईक चिंतातूर झाले होते.
तिचा सर्वत्र शोध घेतला जात होता. (Chandwad)दरम्यान, बुधवारी (दि.१४) सायंकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिस गस्तीवर असताना पथकातील दिला. हवालदार संतोष उफाडे, विलास इंगळे, महिला पोलिस अश्विनी प्रधान यांना एक शाळकरी मुलगी भेदरलेल्या अवस्थेत स्थानकाच्या आवारात नजरेस पडली. प्रधान यांनी तिला सर्वप्रथम लाडाने विश्वासात घेत विचारपूस केली व खाऊ दिला . तिला विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर तिने चांदवड येथून घर सोडून आल्याचे सांगितले. रेल्वे पोलिसांनी त्वरित तिच्या आई-वडिलांशी संपर्क साधून मुलगी रेल्वे स्थानकावर सरक्षित असल्याचे सांगितले.लासलगाव : साठवलेल्या उन्हाळ कांद्याचे भाव पडले
मुलगी सुरक्षित सापडल्याची माहिती मिळतात आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी अवघ्या तासांत नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाणे गाठले. आपल्या मुलीला सुखरुप बघताच आईने तिला कवटाळले. होऊन यावेळी रेल्वे पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी प्रक्रिया पूर्ण करुन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या चोख गस्त व सतर्कतेमुळे बेपत्ता मुलगी आई- वडिलांना पुन्हा मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.