Monday, February 26

Morning News :15 डिसेंबर 2022 सकाळच्या टॉप घडामोडी आता वाचा एका क्लिकवर झटपट ..

Last Updated on December 15, 2022 by Jyoti S.

Morning News :

✒️ रस्त्यांवरील वाहनांची गती किती असावी, याविषयी निर्णय घेतला जाणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बुधवारी राज्यसभेत बोलताना घोषणा

✒️ नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर घसरून 5.85 टक्क्यांपर्यंत आला, मागील 21 महिन्यातील हा सर्वात कमी घाऊक महागाई दर

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


✒️ दिल्लीतील द्वारका येथे बारावीच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी 3 आरोपींना अटक, सफदरजंग रुग्णालयात मुलीवर उपचार सुरु

✒️ सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच झळकावले शानदार शतक, गोव्याकडून खेळताना राजस्थानविरुद्ध केल्या 120 धावा


✒️ मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण 2021-22 मध्ये 1293 मुलांच्या तुलनेत 1690 मुली; केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची बुधवारी राज्यसभेत माहीती

✒️ मेंदौस चक्रीवादळामुळे राज्यात अनेक भागात ढगाळ झालेले वातावरण गुरुवारनंतर (15 डिसेंबर) निवळण्याची शक्यता, राज्यात पुन्हा एकदा थंडीत वाढ होण्याचा अंदाज


✒️ आयपीएल मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी केरळच्या कोची शहरात होणार; एकूण 405 पैकी 273 भारतीय खेळाडू व 132 विदेशी खेळाडूंवर लागणार बोली

Taluka Post Important news: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

✒️ श्रेयस अय्यरने धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला (1424 धावा) टाकले मागे, 2022 मध्ये अय्यर बनला सर्वाधिक धावा (1489) करणारा खेळाडू


✒️ प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा पुण्यात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, इलेक्ट्रिक वाहन उत्पादक प्लांट बनवणार, रोजगारनिर्मिती होणार

✒️ अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ सिनेमाचा कमाईच्या बाबतीत विक्रम, जगभरात 300 कोटींची कमाई करणारा 2022 मधला ठरला तिसरा सिनेमा