Last Updated on December 9, 2022 by Jyoti S.
Mumbai: चहा- साखर आणि पाणी आता ऑनलाइन
Mumbai: पाण्याच्या बाटलीपासून सोन्याचे दागिने आणि चहा-साखरेपर्यंत सर्वच वस्तू, खाद्यपदार्थ सध्या ऑनलाइन पद्धतीने आणि तेही सवलतीच्या दरात घरपोच मागवता येत असल्याने लोकांचा कल त्याकडे अधिक दिसून येतो. डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्याही सध्या तेजीत आहेत. स्वतःची दुचाकी असल्यास या डिलिव्हरी कंपन्यांमध्ये हमखास नोकरी मिळवता येते. कोणत्याही वस्तूची घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा वस्तू मागवणाऱ्या ग्राहकांच्या घराशी थेट संपर्क येत असतो. एरवी अनोळखी क्रमांकावरून आलेले फोनही न उचलणारे आपण एका अनोळखी डिलिव्हरी बॉयला(Mumbai) घरापर्यंत बोलावतो, तेव्हा कोणतीही शंका, भीती, काळजी डोक्यात येत नाही का?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या वस्तू आपण घरापासून पाच- दहा मिनिटांच्या अंतरात जाऊन सहज विकत आणू शकतो त्या वस्तू थेट दारापर्यंत मागवण्याची आवश्यकता आहे का ? इमारतीच्या खाली किंवा जवळच्या रस्त्यावर जाऊन त्या घेण्याचा त्रास आपण का घेत नाही ? वस्तू घरपोच मागवताना आपण सोबत स्वतःची असुरक्षितताही मागवत आहोत हे आपल्या केव्हा लक्षात येणार? याबाबत प्रत्येकानेच विचार करण्याची गरज आहे. लहानपणापासूनच आर्थिक साक्षरता अंगिकारण्याचे महत्त्व!

जर घाणेकर, घाटकोपर, मुंबई(Mumbai)