नाशिक-बेळगाव विमानाचे जानेवारीपासून उड्डाण शक्य

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

ज्योतिरादित्य शिंदे : भुजबळ यांना दिली पत्राद्वारे माहिती

नाशिक, ता. 17 : नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुढील वर्षांच्या जानेवारीपासून सुरू होणे अपेक्षित आहे. कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेंतर्गत कालावधी वाढवून देणे विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे दिली.

श्री. भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडानअंतर्गत किमान दोन वर्षे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. अहमदाबाद व पुण्यासाठी एअर अलायन्स, अहमदाबादसाठी ट्रूजेट व बेळगावसाठी स्टार एअरने या सेवा सुरू केल्या होत्या. परंतु टुजेटने ऑपरेशन बंद केले होते. तसेच स्टार एअर नाशिक मधून ऑपरेशन्स स्थगित करत आहेत. यामुळे उडान योजनेच्या उद्देशा ला आणखी धक्का बसणार आहे.

त्यामुळे या विमान कंपन्यांना उडानअंतर्गत किमान दोन वर्षे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली होती. जानेवारी 2023 पासून नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरू होणे अपेक्षित असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी पत्राद्वारे दिली आहे.

आरसीएस मार्ग स्पाइसजेटद्वारे नाशिक(Nashik) ते हैदराबादला सेवा सुरू आहे. व्हीजीएफ शिवाय 31 डिसेंबर2021 ला किंवा त्यापूर्वी कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सर्व उडान मार्गांसाठी आरसीएस मार्ग किंवा नेटवर्कच्या सुरवातीच्या तीन वर्षांच्या कालावधीचा अतिरिक्त एक वर्षाचा विस्तार, आधीच अनुकूल मानले गेले होते. मे अलायन्स एअरने 1 फेब्रुवारी 2019 ला नाशिक ते अहमदाबाद आणि हैदराबाद आणि 27 ऑक्टोबर2019 ला नाशिक ते पुणे आरसीएस उड्डाणे सुरू केली आणि त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र कोविड- 19 साथीच्या आजारामुळे ती ऑपरेट करू शकली नाहीत. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे पत्रात म्हटले आहे. हेही वाचा बाजार समिती शेतकऱ्यांसाठी खुली; निवडणूक लढवता येणार



Comments are closed.