रस्ता दुरवस्थेविरोधात नाशिककर रस्त्यावर

Last Updated on November 22, 2022 by Taluka Post

पेठ रोडवासीयांचा रास्ता रोको

नाशिक : नाशकातील रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहून आता नागरिकच त्याविरोधात रस्त्यावर उतरले असून, ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. शहरातील रस्ते खड्डेयुक्त झाल्याने अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. वाहन चालविणे जिकीरीचे झाले आहे. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. खड्डयात साचलेली धूळ नाशिककरांना आजारांचे निमंत्रण देणारी ठरते आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, त्वरित रस्ते दुरुस्तीची मागणी केली जाते आहे.

म्हसरूळ : पेठ रोडवरील महापालिका हद्दीतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, वाहन चालवताना अतिशय कसरत करावी लागत आहे, तर रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्याच्या कामासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवारी (दि. 21) घेतली. याप्रकरण पेठ रोडवासीयांनी आक्रोश करत मेघराज बेकरीसमोर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रास्ता रोको न करण्याचे आवाहन केल्याने पोलीस येत नागरिकांमध्ये वाद झाले.

पेठ रोडवरील हनुमान चौक राऊ हॉटेल ते महानगरपालिका हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या अडीच ते तीन किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, तसेच इतर वाहनांचा मोठा राबता असल्याने रस्त्यावरील राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे. नागरिकांनी पोलि नाशिक महानगरपालिका आयुक्त, तसेच संबंधित प्रशासनाशी वेळोवेळी निवेदन, पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून नागरिकांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आल्याने आंदोलन करावे लागल्याचे नागरिकांनी सांगितले

सकाळी दहा वाजेच्या सुमारास परिसरातील पिंगळे वैद्यकीय व्यावसायिक, तसेच नागरिक व महिला प्रतीक मेघराज बेकरीसमोर जमा झाले. या नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेच्या, तसेच लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी येत नाही तोपर्यंत रास्ता रोको करण्यात येईल, असे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांना विरोध केला. पण, नागरिक अगोदरच रस्त्याच्या दुरवस्थेने व धुळीमुळे हैराण झालेले असल्याने पोलिसांचे ऐकण्याच्या त्याची स्थितीत नव्हते. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अन मोठ्या पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मनपा प्रशासनाची चर्चा घडवून देतो, असे सांगितल्यावरही काही राजकीय व्यक्तींनी विरोध केल्यावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. संबंधित मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिवसांत याबाबत लक्ष न घातल्यास पुन्हा कोणालाही न सांगता परिसरातील नागरिक आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात प्रभाकर पिंगळे, सोमनाथ पिंगळे, दिलीप परिसरातील पिंगळे, राजेंद्र ठाकरे, महेश शेळके, सुनील निरगुडे, यंत्र व महिला प्रतीक पिंगळे, विजय पिंगळे, योगेश कापसे, नागरिकांनी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देवरे, तसेच प्रतिनिधींच्या डॉ. सचिन भांबेरें, डॉ. हेमंत साबळे, डॉ. मनीष करण को करण्याचा देवरे, सचिन पवार, दर्शन बोरसे, विलास आवारे
आदींसह नागरिक उपस्थित होते.हेही वाचा :सायक्लॉन डान्स अकॅडमीने थायलंडमध्ये फडकावला तिरंगा