
Last Updated on November 20, 2022 by Taluka Post
नाशिक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2014 मध्ये घोषणा केलेल्या केलेल्या निफाड साखर कारखान्याच्या जागेतील ड्रायपोर्ट प्रकल्प गुंडाळला गेला असून त्याऐवजी या कारखान्याच्या 100 एकर जागेत मल्टी मॉडेल हब उभारले जाणार आहे. या मल्टी मॉडल हबच्या उभारणीसाठी च्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली असून लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्या नंतर प्रकल्पाचे काम काज सुरू होणार असल्या चे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. जेएनपीटी व एनएचआय यांच्या तर्फे 500 कोटीं ची गुंतवणूक असलेला मल्टी मॉडेल हब हा प्रकल्प होणार आहे. हा प्रकल्प साकारल्या नंतर तेथून फळे, भाजी पाला, निर्याती ला मोठी संधी मिळणार आहे.
दरम्यान राज्यात सत्तां तर झाले व नितीन गडकरी यांच्याकडील बंदरांचे मत्रालय गेले. यामुळे या प्रकल्पा साठी पुन्हा नव्याने पाठपुरावा सुरू झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या प्रकल्पा
साठी केंद्रीय पातळी वरून हव्या असलेल्या बाबी व राज्य सरकार शी संपर्क साधण्याचे काम केले, तरी निफाडचे आमदार बनकर यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून कारखान्या वरील विक्री कराचा मुद्दा सोडवून घेतला. यामुळे प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. दरम्यान नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निफाड कारखाना भाडे तत्वावर देण्याचा ही निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारच्या माध्य मातून ड्रायपोर्ट ऐवजी मल्टी मॉडल हब हा नवीन प्रकल्प मंजूर करून घेतला आहे. या प्रकल्पा च्या माध्य मातून निफाड कारखान्याच्या 100 एकर जागेवर फळे, भाजीपाल्या सह इतर कृषी मालाच्या निर्यातील चालना मिळणार आहे. तसेच निफाड कारखान्या च्या 100 एकर जागेच्या मोबदल्या तून निफाड कारखान्या चा कर्जाचा बोजाही कमी होणार आहे. एकाच वेळी निफाड कारखाना सुरू होणे आणि निर्याती साठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीं ची पूर्तता करण्यासाठी मल्टी मॉडल हबची सुविधा उपलब्ध होणे यामुळे निफाड, दिंडोरीसह इतर तालुक्यांमधील कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे.
श्रेया वरून वाद
हा प्रकल्प आपल्यामुळेच मार्गी लागल्याचे आमदार दिलीप बनकर यांनी म्हटल्याचे मध्यंतरी माध्यमांमध्ये आले होते. त्यावर डॉ. भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमुळे विलंब झाल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे. यामुळे हा प्रकल्प मार्गी लागत असताना त्याच्या श्रेयावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरवात झाली आहे. हेही वाचा: दोन लाख भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेचा व्हिसा