
Last Updated on November 22, 2022 by Taluka Post
आमदार बनकर : पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री पवारांचे आरोप फेटाळले
तालुक्यातील जनतेची मी दिशाभूल केलेली नाही. कारखाण्याच्या जागेचा खरा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लागला. हा प्रकल्प निफाड तालुक्यात कारख व्हावा यासाठी आपण काय प्रयत्न केले. त्याचे कागदोपत्री दाखलेच आमदार बनकरांनी दिले. मात्र या प्रकल्पाचे श्रेय आम्हाला नको, हा प्रकल्प लवकर लवकर तालुक्यात होणे काळाची गरज असून त्या माध्यमातून कृषी क्षेत्राला चालना तर तरुणांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपळगाव बसवंत : महाविकास आघाडी सरकारच्या काळातच निफाड साखर कारखान्याच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला. आता त्या जागेवर ड्रायपोर्टऐवजी आता मल्टीलॉजीस्टिक पार्क प्रकल्प होणार असल्याचा खुलासा केंद्र शासनाने मला पत्राद्वारे केला आहे. या कामी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शासनदरबारी सातत्यपूर्ण बैठका घेत तब्बल 33 पत्र केंद्रासह राज्य शासनास पाठविले होते. त्या पत्रांचे कागदोपत्री दाखले देत प्रकल्प केंद्र शासनाचा असला तरी आम्हाला निफाडचे श्रेय घ्यायचे नाही. अनेक वर्षापासून स्पष्ट के खोळंबलेला प्रकल्प निपक्ष भावनेने. तालुक्यात लवकरात लवकर मार्गी लागावा हीच आमची भूमिका असल्याचे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी वर्षापासून स्पष्ट केले.
पिंपळगाव बसवंत शहरात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.यावेळी बनकर म्हणाले की,उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्याला वरदान ठरणारा ड्रायपोर्ट प्रकल्प 2016 पासून निफाड तालुक्यातील यावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.निफाड तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कारखाण्यावरील वस्तू व सेवा विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने सदरची जमीन बोजामुक्त करण्यासाठी शासनदरबारी पत्रव्यवहार करत महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्यपूर्ण बैठका घेतल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सातत्यपूर्ण भेटी त्या काळात घेतल्या.
महाविकास सरकारच्या काळात कारखाण्याच्या जमिनीवरील बोजा कमी करण्याचे आदेश 31डिसेंबर 2021 रोजी देण्यात आल्यानेच आज त्या जागेवर ड्रायपोर्ट ऐवजी मल्टी लॉजिस्टिक पार्क होत आहे. केंद्र शासनाकडून याबत पत्र पाठवून माहिती देण्यात आली. तोच खुलासा ज्या प्रसिद्धीस दिलेला आहे. यात जनतेची कोणती दिशाभूल केली हे अद्यापही कळू शकले नाही. तालुक्यात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्णत्वास यावे हीच इच्छा असल्याचे आमदार बनकर यांनी स्पष्ट केले. हेही वाचा: शिवरायांविरोधातील राज्यपालांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी जोरदार आक्रमक, धोतर सोडण्याचे अनोखे आंदोलन