Pune Murder Mystery : अखेर उकललं एकाच कुटुंबातील 7 जणांच्या मृत्यूचं कारण,अखेर काय झालं? आतली गोष्ट वाचा.

Last Updated on January 27, 2023 by Jyoti S.

Pune Murder Mystery : आतली गोष्ट वाचा.

पुणे नदीत कुटुंबातील 7 सदस्य सापडले पुण्यातील भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कामचनपुण्यातील भीमा नदीत सापडलेल्या सात मृतदेहांच्या प्रकरणात पोलिसांनी लोकांच्या हत्येचाही तपास केला.. जाणून घेऊया नेमकं काय घडलं?

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

पुणे मर्डरचे गूढ उकलले पुण्यातील भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह(Pune Murder Mystery) सापडल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सातही जणांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या सातही जणांची आत्महत्या की हत्या याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. (पुण्यात कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती)अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

आत्महत्या नाही तर हत्या.

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. 18 ते 22 तारखेच्या दरम्यान सात जणांचे मृतदेह सापडले. सुरुवातीला या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यानंतर पोलिसांनी विविध अंगांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या सातही जणांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा: Nashik Murder Case : नाशिकमधील धक्कादायक घटना,डोक्यात दगड घालून अपंग तरुणाची हत्या.

मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सुनियोजित कटातून ही हत्या(Pune Murder Mystery) करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींनी खुनाची कबुली दिल्याने प्रकरणाचे गूढ उकलले आहे. या पाच आरोपींसोबत या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत ज्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

Comments are closed.