आता गुन्हेगारांचे एन्काऊंटर करणार रोबोट

Last Updated on November 28, 2022 by Jyoti S.

फ्रान्सिस्को: रोबोटिक्स भावभावनाही टेक्नॉलॉजीमुळे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे रोबोट्सची नवी पिढी आता माणसांची सर्व कामे करू लागली आहेत. त्याचबरोबर माणसासारख्या भावभावनाही व्यक्त करू लागली
आहे. रोबोट्सच्या या नव्या पिढीबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. अशातच अमेरिकेतील सॅन. फ्रेंन्सिस्को पोलिसांनी गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांना बंदुकीने गोळी झाडून अचूक टिपणाऱ्या रोबोट्सचा वापर पोलीस दलामध्ये करण्याची मागणी केल्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

कॅलिफोर्निया पोलिसांचे प्रवक्ता रॉबर्ट रुएका सांगतात की, गुन्हेगारांचे एन्काऊंटर करण्यासाठी रोबोट्सचा वापर विशिष्ट परिस्थितीतच करण्यात येणार आहे. त्यासाठी कॅलिफोर्निया प्रशासनाकडे परवानगीसाठी विनंती करण्यात आली आहे.

कॅलिफोर्निया पोलिसांकडे आहेत असे १७ रोबोट्स

कॅलिफोर्निया पोलीस दलाकडे अशाप्रकारचे 17 रोबोट्स आधीपासूनच आहेत. त्यापैकी सुमारे डझनभर रोबोट्स पूर्णपणे अॅक्टिव्ह आहेत. बॉम्ब ठेवल्याची अफवा आल्यानंतर त्याची तपासणी करण्यासाठी सध्या या रोबोट्सचा वापर केला जात आहे.