Rooftop Solar Scheme : रूफटॉप सौर योजनेला 2026 सालापर्यंत मुदतवाढ

Last Updated on December 13, 2022 by Jyoti S.

Rooftop Solar Scheme: रूफटॉप सोलर योजनेची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत योजनेंतर्गत अनुदान उपलब्ध राहणार आहे.

नवी दिल्ली: निवासी ग्राहकांना नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे सूचित करण्यात आले आहे की, कोणत्याही विक्रेत्याला राष्ट्रीय पोर्टलवरील अजांच्या शुल्कापोटी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा संबंधित वितरण कंपनीने विहित केलेले नसलेले नेट मीटरिंग / चाचणीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये. देशाच्या कोणत्याही भागातून रूफटॉप सोलर बसवण्यास इच्छुक असलेला ग्राहक राष्ट्रीय पोर्टलवरून अर्ज करू शकतो तसेच नोंदणीपासून थेट त्याच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा देखील तो घेऊ शकतो. राष्ट्रीय पोर्टल अंतर्गत १४,५८८ रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण देशासाठी आणि निवासी राहणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या परिसरातील माहितीत असलेल्या वितरण कंपनीने नोंदणी केलेल्या कोणत्याही एका विक्रेत्याकडून रूफटॉप सोलर(Rooftop Solar Scheme ) प्लांट बसवावा लागेल. नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी राष्ट्रीय पोर्टलवरदेखील उपलब्ध आहे. ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी, ग्राहक ,विक्रेता आणि यांच्यामधील कराराचे स्वरूप हे राष्ट्रीय पोर्टलवर देण्यात आले आहे. ह्या कराराच्या अटी परस्पर रित्या मान्य केल्या जाऊ शकतात.Solar Rooftop:फ्री मधे घरावर बसवा सोलार,आणि राहा 23 वर्ष बिलापासून मुक्त 

विक्रेत्याने ग्राहकाला किमान ५ वर्षे देखभाल सेवा पुरवल्या पाहिजेत आणि काही चूक झाल्यास संबंधित वितरण कंपनी विक्रेत्याची बँक हमी रोखू शकते. राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करण्यासाठी कोणतेही पैसे घेतले जाणार नाही आणि नेट मीटरिंगचे शुल्क संबंधित कंपन्यांनी ठरवले आहे. याशिवाय, अनुदान प्राप्त करण्यासाठी कोणत्याही विक्रेत्याला किंवा वितरण कंपनीला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही तसेच मंत्रालयाकडून अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल, असेही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.

Comments are closed.