School curriculum : शालेय अभ्यासक्रमात आता श्रीमद् भगवद्गीतेचा समावेश, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!!

Last Updated on December 20, 2022 by Jyoti S.

School curriculum : शालेय अभ्यासक्रमात आता श्रीमद् भगवद्गीतेचा समावेश, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!!

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून सहावी, सातवीतील पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद् भगवद्गीतेचे संदर्भ(School curriculum), तर अकरावी व बारावीच्या संस्कृत पुस्तकात भगवद्गीतेतील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आपला वारसा समजून घ्या..

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. शिक्षण मंत्रालयाने 2020 मध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनमध्ये आंतर शाखीय आणि आंतर विद्याशाखांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली विभागाची स्थापना केली आहे.हेही वाचा: Motivational : म्हणून गाढ झोपेतही पक्षी खाली पडत नाहीत

राष्ट्रीय शैक्षणिक(School curriculum) धोरणानुसार, भारताचे पारंपरिक ज्ञान, जे शाश्वत व सर्वांच्या कल्याणासाठी आहे. आपण आपला वारसा समजून घेतला पाहिजे, तसेच जगाला चांगले काम करण्याची भारतीय पद्धत शिकवली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

शालेय जीवनापासूनच मुलांना भगवद्गीतेची ओळख व माहिती व्हावी, यासाठी शाळेतील पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद् भगवद्गीतेचा समावेश करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नमूद केले.