Monday, February 26

Senior citizen: ज्येष्ठ नागरिकांना धक्का, केंद्र सरकारचा रेल्वे सवलतीबाबत एक मोठा निर्णय..

Last Updated on December 15, 2022 by Jyoti S.

Senior citizen

कोरोना काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना(Senior citizen) रेल्वे तिकिटात दिली जाणारी सवलत बंद केली होती. मात्र संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या सवलतीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता होती, तसेच आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा ज्येष्ठांना धक्काच दिला आहे.

महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ज्येष्ठांना रेल्वे प्रवासासाठी पुन्हा सवलती सुरू होण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिले.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

रेल्वेमंत्री काय म्हणाले..?

ते म्हणाले, की रेल्वेने गेल्या वर्षी प्रवासी सेवेवर 59 हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. ही खूप मोठी रक्कम असून, अनेक राज्यांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे. सध्या रेल्वेची स्थिती चांगली नाही, हे सर्वांनी बघायला हवे.Breaking news : 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज, ‘या’ विद्यार्थ्यांचे चक्क शुल्क झाले निम्मे..

रेल्वेला दरवर्षी पगारावर 97 हजार कोटी, तर पेन्शनवर 60 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. शिवाय रेल्वे 40 हजार कोटी रुपये फक्त इंधन खरेदीवर खर्च करीत असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.