
Last Updated on December 6, 2022 by Taluka Post
सिन्नर, ता. ५ : शहरातील दिंडोरी प्रणीत श्री. स्वामी समर्थ आध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात १ ते 8 डिसेंबर पर्यंत दत्त जयंती सप्ताह आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रविवारी चंडीयागासाठी केंद्रामध्ये सुमारे ६०० भाविकांनी उपस्थिती लावली.शहरातील स्वामी समर्थ आध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात सप्ताह काळात ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ च्या जयघोषात व स्वामी नामाच्या जयजयकारातसिन्नर सप्ताहानिमित्त सामुदायिक गुरुचरित्र पठण करण्यात असून त्यानंतर होम हवनाला सुरवात करण्यात येते.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
प्रत्येक दिवशी वेगवेगळे याग असून यामध्ये श्री गणेश याग, मनोबोध, चंडीयाग, स्वामी याग, मल्हारी याग होत असतात. या यागांसाठी सिन्नर शहरातील अनेक महिला व पुरुष यांची उपस्थिती ही लक्षणीय असते. रविवारी चंडी यागाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी गुरुचरित्र वाचल्यानंतर होम हवन करण्यात आले चंडीयागासाठी सिन्नर शहरातील सुमारे ६०० सेवेकरांनी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये सर्वाधिक महिलांची उपस्थिती होती.
याप्रसंगी सप्तशती या ग्रंथाचे पठण करण्यात आले. एका सुरात एका तालात सर्वांनी सप्तशती पठण केले . बोला अंबा माता की जय, बोल सप्तशृंगी माता की जय, उदोग उदे अंबा माता या नामघोषाने सर्व श्री स्वामी समर्थ दरबार हा भक्तिमय होत आहे. श्री स्वामी समर्थ जप, गायत्री जप, आधी नाम घोष घेण्यात आलेला होता. बुधवारी दत्त जयंती सोहळा असल्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. श्री दत्तजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ केंद्रात फुलांची व रांगोळ्यांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून यासाठी सेवेकरी वर्ग परिश्रम घेत आहेत.
Comments are closed.