स्मार्ट स्कूलला पायघड्या अन् अंगणवाड्या उघड्या !

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

मनपाची अजब तऱ्हा 89 अंगणवाड्यांना इमारतच नाही.

140 अंगणवाड्या मूलभूत सुविधांविना

महापालिकेच्या ज्या अंगणवाड्यांना स्वत:ची जागा आहे. त्यांचीही अवस्था फारशी बरी नाही. 140अंगणवाड्यांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. यातील बहुसंख्य अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत. काही अंगणवाड्यांचे छत गळके, तर काहींचे दरवाजे-खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत.

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या निधीतून 69 शाळा स्मार्ट स्कूलमध्ये परावर्तित करण्याचा निर्णय घेणाऱ्या महापालिकेचे गोरगरिबांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अंगणवाड्यांकडे मात्र साफ दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेच्या 89 अंगणवाड्या इमारतीविना अक्षरशः उघड्यावर खासगी जागेत, मंदिरांच्या आवारात भरविल्या जात आहेत. समाज कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी या अंगणवाड्यांना हक्काची इमारत उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, मेनकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर या अंगणवाड्यांना कुणीही वाली उरले नसल्याचे चित्र आहे.

शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरात 419 अंगणवाड्या चालविल्या जातात. शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी, प्ले-ग्रुपचे सध्या मोठ्या प्रमाणावर पेव फुटले असताना प्रामुख्याने झोपडपट्ट्यांमध्ये अंगणवाड्यां गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या वर्षांत महापात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या झाले आहे. अंगणवाड्या महत्त्वपूर्ण भूमिका विभागाच्या उ बजावत आहेत. खासगी शाळांच्या स्वीकारल्यानंत जीवघेण्या स्पर्धेत महापालिकेच्या अंगणवाड्यांन शाळांमधील विद्यार्थी टिकून केलेल्या सर्वे राहण्यासाठी स्मार्ट स्कूल प्रकल्प तब्बल 89 राबविला जात आहे. मात्र, स्वतःची जाग कुषोषणाविरोधातील लढ्यात उघड्यावरच महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या अंगणवाड्यांकडे गेल्या काही ना शिक्षणाच्या वर्षांत महापालिकेचे साफ दुर्लक्ष गण्यासाठी या झाले आहे.

समाजकल्याण वपूर्ण भूमिका विभागाच्या उपायुक्त पदाची सूत्रे सगी शाळांच्या स्वीकारल्यानंतर डॉ. मेनकर यांनी हापालिकेच्या अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटीद्वारे बार्थी टिकून केलेल्या सर्वेक्षणात 419 पैकी स्कूल प्रकल्प तब्बल 89 अंगणवाड्यांना आहे. मात्र, स्वतःची जागाच नसल्याने त्या ल लढ्यात उघड्यावरच भरविल्या जात देणाऱ्या या असल्याचे समोर आले होते. अंगणवाडी कर्मचारी खासगी जागांमध्ये, मंदिराच्या आवारात, झाडाखाली अंगणवाड्या भरवून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. खासगी जागांमध्ये भरणाऱ्या अंगणवाड्यांना महापालिकेकडून कुठलेही भाडे, अदा केले जात नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनातूनच हा खर्च भागवावा लागत आहे. यात नाशिक पूर्व विभागात 16, नाशिक पश्चिममध्ये आठ, पंचवटीत 22, सातपूरला आठ, नाशिकरोडला 20, तर नवीन नाशिक विभागातील 15 अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत मिळवून देण्यासाठी उपायुक्त डॉ. मेनकर यांनी प्रस्ताव तयार करून तो आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मान्यतेसाठी सादर करण्याची तयारी दर्शविली होती. मेनकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर मात्र या अंगणवाड्यांना कुणी वालीच उरला नाही. हेही वाचा: आयमाच्या बैठकीत अभ्यासक्रम निर्मितीवर भर

Comments are closed.