भगूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

भगूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानाचे सावरकरांच्या जन्मभूमीत तीव्र पडसाद उमटले. मनसेने आयोजित केलेल्या गूर बंदला भाजप आणि शिवसेनेने पाठिंबा दिल्याने संमिश्र प्रतिसाद मिळाला. यानंतर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात येऊन त्यांचा निषेध करण्यात आला. केवळ प्रसिद्धीसाठी असे बेताल वक्तव्य करण्याआधी पिढीजात श्रीमंत असलेल्या सावरकरांच्या कुटुंबाचा काँग्रेसने अभ्यास करावा; मगच वदतव्ये करावीत, असा सल्ला आंदोलकांनी दिला. सावरकरांवरील विधानाच्या निषेधार्थ मनसेने पुकारलेल्या भगूर बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मनसेच्या आंदोलनातभाजपसह शिंदे गटानेही सहभागी होत राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केले.

भारत जोडो यात्रेतून स्वातंत्र्यवीरांविरोधात वक्तव्ये केली जात असल्याने या यात्रेला भारत जोडो यात्रा कसे म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित करत उपस्थितांनी काँग्रेसच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. ज्या १५०० रुपयांच्या पेन्शनचा उल्लेख राहुल गांधी सातत्याने करत असतात. त्यापेक्षा सावरकरांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास गांधी यांनी करावा. परंपरागत जहागीरदार असलेल्या सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी सर्व संपत्तीला लाथ मारली, हा इतिहास त्यांनी माहिती करून घ्यावा.

कोणीतरी दिलेल्या माहितीच्या आधारावर बोलणाऱ्या राहुल गांधींनी याद्वारे वैचारिक दिवाळखोरी जाहीर केली असून, त्यांच्या वक्तव्याचा सावरकर समूहाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. हेमंत गोडसे, नाशिक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, मनसे शहराध्यक्ष सुमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. सावरकर स्मारकातही मनोज कुंवर यांनी निषेध व्यक्त केला.

यावेळी मनसेचे कैलास भोर, नीलेश हासे, शेखर गाडेकर, भूषण कापसे, भूपेश जोशी, शिवसेनेचे विक्रम सोनवणे, अमोल गणोरे, भाजपचे प्रसाद आडके आदींसह भगूरकर उपस्थित होते. हेही वाचा : मराठा समाजाला १०, ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्या : भुजबळ

Comments are closed.