
Last Updated on November 22, 2022 by Taluka Post
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित होणाऱ्या 996 हेक्टर जमिनीसाठी नाशिक तालुक्यातील भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ज सोमवारी (दि.21) दिंडोरी तालुक्यातील भूसंपादनासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील 52. किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 174 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार असून, या अधिसूचनेनुसार 12 गावातील ये अधिसूचित जमिनी केंद्र सरकारकडे होणार आहेत.
चेन्नई हा ग्रीनफिल्ड महामार्ग सुरत- नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून जाणार असून, जिल्ह्यातील ९९६ हेक्टर जमीन यासाठी संपादित केली जाणार आहे. सुरगाणा, दिंडोरी, पेठ, नाशिक, निफाड आणि सिन्नर या तालुक्यातून हा कर 52 मार्ग जाणार आहे. नाशिक तालुक्यातील दर 74 आडगाव, ओढा, विंचूर गवळी आणि लाखलगाव येथून हा मार्ग जाणार असल्याने येथील जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात यापूर्वी अधिसूचना काढण्यात आली आहे. आता दिंडोरी तालुक्यातील 52 वर्ग किलोमीटर महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे 1600 किलोमीटरचे अंतर 1250 कि.मी. होणार आहे, तर नाशिक-सुरत अंतर अवघे 176 कि. मी.येणार आहे.
याने या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, नगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. दिंडोरी तालुक्यामधील भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मागील वर्षी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आक्षेप ही नोंदवण्यासाठी मुदत दिलेली होती. विहित डली मुदतीमध्ये 603 आक्षेप आले होते. या तील आक्षेपांचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी निराकरण रस्ते. करून ते आक्षेप नामंजूर करण्यात आले. त्यामुळे दिंडोरी वितरण कंपन्या आणि उत्पादक, बियाणे, यंत्रे उत्पादक कृषी संशोधन केंद्रे, , अन्नप्रक्रिया उद्योग, सहभाग असेल.
तालुक्यातील 52 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 174 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी जारी अधिसूचनेनुसार आंबेगण, ढकांबे, धाऊर, इंदोरे, जांबुटके, नाळेगाव, पिंपळनारे, रामशेज, रासेगाव, वरवंडी, शिवनई, उमराळे या गावांतील अधिसूचित जमिनी केंद्र सरकारकडे वर्ग होणार आहेत. हेही वाचा : नाशकात 118 अपघात प्रवणक्षेत्र
Comments are closed.