Tarunana Nokari: महाराष्ट्रातील दीड लाख तरुणांना मिळणार नोकऱ्या, राज्य सरकारचा मोठा निर्णय…!!

Last Updated on December 16, 2022 by Jyoti S.

Tarunana Nokari: हिंदुजा ग्रुपसोबत करार

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी आहे. येत्या काळात राज्यातील तब्बल दीड लाख तरुणांना विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची संधी मिळणार आहे.

राज्य सरकारने हिंदुजा ग्रुपसोबत सामंजस्य करार केला असून, त्यानुसार हिंदुजा ग्रुप मुंबईसह महाराष्टात एकूण 12 क्षेत्रांमध्ये तब्बल 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातून दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हिंदुजा ग्रुपचे मुख्य जी. पी. हिंदुजा यांच्यात हा करार झाला. त्यानुसार आरोग्य, शिक्षण, सायबर, मनोरंजन, नवीन टेक्नॉलॉजी, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्टरिंग अशा विविध क्षेत्रात हिंदुजा समूह गुंतवणूक करणार आहे.Fresher Job: फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी, अ‍ॅमेझॉन कंपनीमध्ये बंपर पदभरती सुरु..

गेल्या महिन्यात लंडनमधील ‘हाऊस ऑफ लॉर्ड’मध्ये झालेल्या गुंतवणूकविषयक सेमिनारमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रात गुंतवणूकीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ही गुंतवणूक आम्ही करत असल्याचे अशोक हिंदुजा यांनी स्पष्टपने सांगितले.