संपूर्ण नाशिक शहर येणार सीसीटीव्हीच्या कक्षेत

Last Updated on November 27, 2022 by Jyoti S.

मुख्यमंत्र्यांकडून पंधरा कोटीचा निधी मंजूर

नाशिक : शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा किंबहुना गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सीसीटीव्ही प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या मूलभूत सुविधांचा विकास योजनेतून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहरात चोन्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड, मद्यपीकडून होणारी गुंडागर्दी आदी गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पोलीस प्रशासन जरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पडत असले, तरी शहराच्या वाढत्या व्याप्तीमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. शहरामध्ये सीसीटीव्हीची संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्या कारणाने चोरटे आणि गुन्हेगारांचे चांगलेच फायंदे होत आहे . अचूक पुरावे हाती येत नसल्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे कठीण होत जाते. यातूनच शहरभर सीसीटीव्ही असावेत, अशी मागणी सातत्याने शहरातील विविध संस्था आणि शहवासीयांकडून खा. गोडसे यांच्याकडे होत होती. गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर शिंदे यंनी मूलभूत सोयी सुविधांचा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या २५ कोटींच्या निधीतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. अन्य विकासकामेदेखील केली जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरवासीयांची सुरक्षा मजबूत होणार असून, गुन्हेगारांवर निश्चितच मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

hemant godase 1 Taluka Post | Marathi News

या योजनेअंतर्गत शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी पंधरा कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या निधीतून शहरातील रस्ते आणि चौकात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, काही विकासकामेही करण्यात येणार आहेत. या सीसीटीव्हीमुळे पोलीस प्रशासनाचाही कामाचा भार काही अंशी कमी होणार असून, शहराची सुरक्षा मजबूत होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. या सीसीटीव्हीमुळे आता नाशिकमध्ये संपूर्ण शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे.