
Last Updated on November 22, 2022 by Jyoti S.
कर्मचाऱ्यांचा गणवेशदेखील सोनेरी या हॉटेलचे सोन्यावरचे प्रेम कर्मचाऱ्यांच्या वेषांवरूनही दिसून येते. हॉटेल व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी ‘गोल्डन ड्रेस कोड’ निश्चित केला आहे. खरे तर कर्मचाऱ्यांचा ड्रेस लाल रंगाचा आहे. मात्र त्याच्या किनारी सोनेरी रंगाच्या आहेत.
हनोई : जगात अशी ‘डोल्स अनेक पंचतारांकित हॉटेल्स ‘ आहेत की एका जमान्यात राजा-महाराजांच्या आलिशान महालांसारखी आहेत. परंतु जगात असे एक पंचतारांकित हॉटेल आहे की जे पूर्णपणे सोन्याने मढवण्यात आले आहे. या हॉटेलमधील दरवाजे, खिडक्या, फर्निचर खाण्याची भांडीही सोन्याची आहेत. एवढेच नव्हे तर हॉटेलमधील बाथरूमही शुद्ध सोन्याने मढवलेली आहेत.


‘डोल्स हनोई गोल्डन लेक ‘हॉटेल’ असे या पंचतारांकित हॉटेलचे नाव आहे. हे हॉटेल पंचवीस मजली आहे. त्यामध्ये पर्यटकांसाठी आलिशान, सुसज्ज अशा 400 खोल्या आहेत. प्रत्येक खोलीतील सर्व वस्तू सोन्याने मढवलेल्या आहेत. या अनोख्या गोल्डन हॉटेलच्या गच्चीवर एक आलिशान स्वीमिंग पूल आहे. या स्वीमिंग पूलचे वैशिष्ट्य म्हणजे याचा बाह्य भिंतींच्या वीटाही सोन्याने मढवलेल्या आहेत.