Last Updated on December 8, 2022 by Jyoti S.
Weather update:Rain forecast from tomorrow।उद्यापासून पावसाचा अंदाज
पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यामध्ये सगळीकडे ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तयार झाले आहे. राज्यामध्ये पावसाला (Rainfall) पोषक असे हवामान होत असून, उद्यापासून (ता. ९) काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज (Rain Forecast) हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यातील थंडी गायब झाली आहे. राज्याच्या तापमानामध्ये चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा वाढू लागला आहे. राजस्थानातील चुरू येथे बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्येच देशाच्या सर्व सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे . राज्यात मात्र थंडी नाहीशी झाली आहे. दिवसा ढगाळ हवामानासह ऊन चांगलेच वाढू लागले आहे.पुढील २ दिवस या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस
बुधवारी (ता. ७) गडचिरोली मध्ये राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे .तसेच रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३५.५ अंश तापमान नोंदले गेले आहे . उपसागरातील वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्रासह इतर दक्षिण भारतात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उद्यापासून कोकण, तर शनिवारपासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर रविवारपासून (ता. ११) विदर्भात तुरळक ‘ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने (Weather update)वर्तविला आहे.
पूर्व किनाऱ्यावर ‘मनडुस’ हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामधील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून तेथे वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झालेली आहे. ही वादळाची प्रणाली कारईकलपासून पूर्वेकडे ६७० किलोमीटर, व चेन्नईपासून ७५० किलोमीटर आग्नेयेकडे होती.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
बुधवारी (ता. ७) काळ रात्रीच या प्रणालीचे ‘मनडुस’ चक्रीवादळात रूपांतर झालेले आहे . आज (ता. ८) सकाळपर्यंत ही वादळी प्रणाली उत्तर तमिळनाडू तसेच दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार आहे. त्यामुळे पूर्व किनाऱ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने (Weather update) दिला आहे.