रोहितला कर्णधार पदावरून हटवणार?

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

ट्वेण्टी-२० संघाची धुरा हार्दिककडे सोपवण्याचे संकेत

नवी दिल्ली: ट्वेण्टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघात व्यापक प्रमाणावर बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यानुसार नियमित कर्णधार 1 रोहित शर्माला ट्वेण्टी-२० संघाच्या 7 कर्णधार पदावरून हटवण्याची दाट शक्यता दिसत आहे. रोहित शर्माचा वारसदार म्हणून अष्टपैलू हार्दिक पंड्याचे नाव आघाडीवर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि निवड समिती याबाबतचा निर्णय नववर्षात जाहीर करू शकते.

अशी मागणी माजी कर्णधार व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी केली आहे. त्यानुसारच बीसीसीआय आणि निवड समिती सध्या विचारविनियम करत आहे. तसेच २०२४ मधील ट्वेण्टी-२० संघाची उभारणी करण्याचा प्रयत्न न्यूझीलंड दौऱ्यातून करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. रोहितमध्ये अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक आहे.

त्यामुळे आणखी दीड ते दोन वर्ष तरी एकदिवसीय व कसोटी संघाचे नेतृत्व तो करू शकतो. मात्र २०२४ ट्वेण्टी-२० विश्वचषकात हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने खेळावे, अशी बीसीसीआयची अपेक्षा आहे.

रोहितसोबत बीसीसीआय विराट कोहलीला सोबत घेऊन बैठक घेणार आहे. दोघांना कसोटी आणि एकदिवसीय संघातील आपल्या स्थानाबाबत माहिती दिली जाऊ शकते. रोहित आणि विराट यांच्या भवितव्याबाबत घाईघाईने बीसीसीआय निर्णय घेणार नाही. दोघांचे कसोटी आणि एकदिवसीय संघातील स्थान अद्यापही कायम आहे.

लोकेश, पंत- पिछाडीवर

क्रिकेटच्या तिसऱ्या संघाची धुरा हार्दिककडे सोपवण्याच्या चर्चांना उघाण आल्यामुळे के. एल. राहुल आणि रिषभ पंत कर्णधार पदाच्या शर्यतीमधून बाहेर पडले आहेत. बीसीसीआयने भविष्यातील कर्णधार म्हणून लोकेश आणि पंतला पहिली पसंती दिली होती. मात्र लोकेशची ढासळती कामगिरी चिंतेचा विषय आहे. नुकत्याच आटोपलेल्या विश्वचषकात लोकेशच्या अपयशाचा संघाला फटाका बसला. लोकेशकडून ट्वेण्टी-२० मधील उपकर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते. मात्र संघातील त्याचे स्थान कायम राहील. कर्णधार पदासाठी पंतचा पर्यायही बीसीसीआय पडताळून पाहत होती. मात्र गुजरातला आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून दिल्यामुळे हार्दिकचे नाव पुढे आले.

म्हणून निर्णय लांबणीवर

भारतीय संघ जानेवारी-२०२३ मध्ये श्रीलंकेविरोधात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची ट्वेण्टी-२० मालिका खेळणार आहे. त्यामुळेच हार्दिकच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ टाकण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. श्रीलंकेविरोधातील मालिकेत संघातील वरिष्ठ खेळाडूंना पुन्हा एकदा विश्रांती दिली जाऊ शकते.

ट्वेण्टी-२० श्रीलंका संघाविरोधातील मालिके अगोदर हार्दिकची निवड

एकदिवसीय २०२३ विश्वचषकापर्यंत रोहित कर्णधार पदावर कायम

कसोटी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी किंवा २०२४ पर्यंत रोहित कर्णधार राहणार. हेही वाचा: बीसीसीआय: टी-२० विश्व कपमध्ये खराब प्रदर्शनाचे परिणाम! चेतन शर्मा की अगुआई निवड समिती बर्खास्त

Comments are closed.