सह्याद्री युवा मंच तालुका क्रीडा शिक्षक संघटनेतर्फे कुस्ती स्पर्धा

Last Updated on November 22, 2022 by Taluka Post

सिन्नर : सहयाद्री युवा मंच सिन्नर आणि सिन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्यावतीने सिन्नर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा सन 2022-23 या सिन्नर गौरव येथील सहयाद्री क्रीडा प्रबोधनी येथील हॉल मध्ये शनिवारी (दि. 19) रोजी उत्साहात संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक मनोज भगत तसेच शैलेश नाईक व सामाजिक कार्यकर्ते अनिल सरवार मिठे यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किरण यावेळी सह्याद्री युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष उदय सांगळे तसेच वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एस. वारुंगसे, उत्तम दळवी, भिकुसा विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदाळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते साहेबराव पाटील, क्रिडा शिक्षक ज्ञानेश्वर नवले, रामनाथ जाधव, एम.के. वाघ सुदाम कराड, मधुकर काळे तसेच तालुक्यातील सर्व किडा शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत क्रिडा स्पर्धांना सुरवात करण्यात आली. यावेळी सुत्रसंचालन किरण मिठे यांनी केले तर आभार, नवले यांनी मानले.

मुलींचे कुस्ती सामने जि.प. च्या माजी अध्यक्षा शितल सांगळे यांच्या हस्ते लावण्यात आले. मुलांचे कुस्ती सामने पंजाबाबा आव्हाड, तात्या भिलारे, राजु पोमनर, मोहन लहाने, बाळु बिन्नर, वाल्मीक हांडोरे, कैलास उगले, रामदास कांदळकर, शाम कासार, दत्ता कळसकर, सुनिल येवलेकर, अशोक सोनवणे आदी पैलवानांच्या हस्ते लावण्यात आले. यांसह क्रीडा प्रबोधनीतील भावेश कांदळकर, संकेत निगळ पवन सूर्यवंशी, शिवराज मोरे, संकेत झोमन आदी कुस्तीवीर उपस्थित होते. अशोक शेळके, शशि कालेकर,बाळु मनोज महात्मे, राजेश भाबड, नवनाथ घुगे, रामदास विजयगिते, नितीन उगले, शुभम घुगे, यतिन,सुनिल भाबड, अविनाश दराडे, विशाल पालवे, संकेत नवानांच्या आव्हाड, बळी कापडी, संदीप आडके, आदित्य, धनीतील वाजे आदी उपस्थीत होते. यात निवड झालेले कुस्तीवीर हे जिल्हास्तरीय स्पर्धासाठी पात्र होतील असे जाहिर करण्यात आले. हेही वाचा: 66666666..अंबाती रायुडूचा भाऊ रोहितने षटकारांचा पाऊस पाडत झंझावाती शतक ठोकले, रोहितच्या साथीने 132 धावा केल्या

Comments are closed.