Last Updated on December 25, 2022 by Jyoti S.
Bangladesh lost: बांगलादेशला हरवलं, भारतासमोर आता श्रीलंकेचे आव्हान, रोहितबाबत मोठी बातमी समोर…
Bangladesh lost: बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची मालिका टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर नवीन वर्षात आता भारतीय संघाला घरच्या मैदानावर श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका, तसेच 3 सामन्यांची वन-डे मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे.
आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
बांगलादेश दौऱ्यावर दुसऱ्या वन-डे सामन्यात हाताच्या अंगठ्याला बाॅल लागल्याने रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो पूर्ण बांगलादेश दौऱ्यातूनच बाहेर झाला. अजूनही तो दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही तो बाहेर झाला आहे.
न्यूझीलंडच्या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या टी-20 सीरीजमध्ये हार्दिक पांड्याने भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व केले होते. आगामी टी-20 वर्ल्ड कप दृष्टीने त्याच्याकडेच टी-20 संघाचे नेतृत्व देण्याची चर्चा होत आहे. त्यामुळे रोहितच्या जागी हार्दिक पांड्यालाच भारतीय संघाचा नियमित कर्णधार बनवले जाण्याची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिकेतही तोच नेतृत्व करू शकतो.
रोहित शर्मा दुखापतीमुळे टी-20 मालिका खेळणार नसला, तरी वन-डे मालिकेत त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. (Bangladesh lost)अर्थात, त्याआधी त्याच्या दुखापतीबाबत जाणून घेतलं जाईल. संपूर्ण फिट असला, तरच त्याचा वन-डे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.हेही वाचा: IND WIN 2ND TEST: भारताने बांगलादेशला त्यांच्याच घरात क्लीन स्वीप केले
श्रीलंकेविरुद्धचे वेळापत्रक
टी-20 मालिका
3 जानेवारी – मुंबई
5 जानेवारी – पुणे
7 जानेवारी – राजकोट
वन-डे मालिका
10 जानेवारी – गुवाहाटी
12 जानेवारी – कोलकाता
15 जानेवारी – तिरुवनंतपुरम