ट्वेण्टी – २० विश्वचषक स्पर्धेच्या ढाच्यात बदल २० संघांचा सहभाग

Last Updated on November 23, 2022 by Taluka Post

दुबई : वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत २०२४ साली होणाऱ्या ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ढाच्यात बदल करण्यात आला आहे. गेल्या दोन विश्वचषक स्पर्धांपेक्षा हा ढाचा नवीन असेल. स्पर्धेत सहभागी होणारे वीस संघ प्रत्येकी पाच संघ याप्रमाणे चार गटांत विभागले जातील.याआधी २०२१ आणि २०२२ साली झालेल्या ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये प्राथमिक फेरीचे सामने सुरुवातीला होत आणि त्यानंतर सुपर बाराचे सामने होत असत. त्यातून प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरत. पण आता ती पद्धत बदलण्यात आली आहे. नवीन ढाच्याप्रमाणे चार गटातील प्रत्येकी दोन अव्वल संघ सुपर आठमध्ये दाखल होतील. हे आठ संघ प्रत्येकी चारप्रमाणे दोन गटांत विभागले जातील. या दोन गटांतील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यातील विजेत्यांमध्ये अंतिम सामना खेळला जाईल.

२०२४ सालातील ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बारा संघ आधीच पात्र ठरले आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडीज या संघांना यजमान म्हणून स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. यंदाचा विजेता इंग्लंड, उपविजेता पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड हे संघ २०२२ सालात पहिल्या आठ र संघांत असल्यामुळे ते पात्र ठरले आहेत. १४ नोव्हेंबर अंतिम तारीख असलेल्या आयसीसी ट्वेण्टी-२० विश्वक्रमवारीत अफगाणिस्तान आणि बांगलादेश दोन सर्वोत्तम संघ असल्यामुळे त्यांनाही मुख्य स्पर्धेत स्थान मिळणार आहे. उर्वरित आठ संघ हे पात्रता स्पर्धेतून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. हेही वाचा: बीसीसीआय: टी-२० विश्व कपमध्ये खराब प्रदर्शनाचे परिणाम! चेतन शर्मा की अगुआई निवड समिती बर्खास्त