Last Updated on December 10, 2022 by Taluka Post
Ind vs Ban 3rd ODI LIVE: इशान किशनने ठोकले द्विशतक ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात ईशान किशनने बांगलादेशला खिंडार पाडले. या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ईशान किशनने द्विशतक ठोकले, जे त्याच्या कारकिर्दीतील पहिले शतक होते.
बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा डावखुरा सलामीवीर इशान किशनच्या बॅटने पेट घेतला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याला फक्त एकच सामना खेळायचा होता, पण त्याने एकाच डावात इतक्या धावा केल्या, की संपूर्ण मालिका खेळून अनेक फलंदाज करू शकणार नाहीत. चट्टोग्राम येथील तिसऱ्या वनडेत द्विशतक झळकावून त्याने इतिहास रचला.
Ind vs Ban 3rd ODI LIVE: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा वनडे आज चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताला लाज वाचवण्याची संधी आहे, तर यजमान संघाला क्लीन स्वीप करायचा आहे.
Ind vs Ban 3rd ODI LIVE: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज, शनिवारी 10 डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे.
भारताला पहिला झटका शिखर धवनच्या रूपाने पडला, ज्याला 3 धावा करता आल्या. इशान किशनने शानदार अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकाचे त्याने शतकात रूपांतर केले. शतक ठोकल्यानंतर किशनने धावगती अधिक वेगाने वाढवली आहे. यादरम्यान त्याच्या आणि कोहलीमध्ये दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारीही झाली. कोहलीने 7 डावांनंतर 50 धावांचा टप्पाही पार केला.
या सामन्यासाठी बांगलादेश संघात 2 आणि भारतीय संघात तेवढेच बदल करण्यात आले आहेत. नसूम अहमदच्या जागी तस्किन अहमदला संधी मिळाली आहे, तर शांतोच्या जागी यासिर अलीला संधी मिळाली आहे. भारतीय संघात कर्णधार रोहित शर्माच्या जागी ईशान किशन आला आहे, तर दीपक चहरच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळाली आहे.हेही वाचा: India: केएल राहुलच्या कर्णधारपदावर सबा करीमने उपस्थित केले प्रश्न