Last Updated on December 13, 2022 by Taluka Post
IND VS BAN: बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाची ‘कसोटी’ लागणार, ‘अशी’ असणार भारताची ‘प्लेईंग-11’..
?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
IND VS BAN: बांग्लादेशविरुद्ध वन-डे मालिका 2-1 अशी गमावल्यानंतर आजपासून (ता. 14) सुरु होत असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही मालिका महत्वपूर्ण ठरणार आहे. भारताने ही मालिका 2-0 अशी जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ थेट दुसऱ्या स्थानावर जाऊ शकतो.
वन-डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये भारताने आक्रमक धोरण अवलंबले होते. तेच धोरण कसोटीतही कायम राहू शकते. विशेष म्हणजे, या फॉरमॅटमध्ये गेल्या 22 वर्षात भारताने बांगलादेशविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. भारताने बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळले असून, पैकी 9 जिंकले, तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारतीय संघाचा मागील रेकाॅर्ड चांगला असला, तरी बांगलादेशविरुद्ध गाफील राहून चालणार नाही. कॅप्टन रोहित शर्माच्या दुखापतीमुळे केएल राहुल याच्याकडे संघाची धुरा असेल.
शाकिब अल हसनला दुखापत
भारताची संभाव्य प्लेइंग -11
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
वेळ – सकाळी 9 : 30 वाजेपासून