India Vs Srilanka : आता श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि वनडे सीरिज, ‘असा’ असेल भारतीय संघ..

Last Updated on December 28, 2022 by Jyoti S.

India Vs Srilanka : भारत विरुद्ध श्रीलंकामध्ये येत्या 3 जानेवारीपासून 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारताचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. बीसीसीआय आता संघ निवडीकडे विशेष लक्ष देऊन युवा खेळाडूंना अधिक संधी देत आहे.

आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीलंकेविरुद्धच्या(India Vs Srilanka) टी-20 मालिकेसाठी व वनडे मालिकेसाठी संभाव्य 16 खेळाडूंचा भारतीय संघ आता जाहीर केला गेला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईमध्ये, दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यामध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना 7 जानेवारीला राजकोट येथे खेळवला जाणार आहे.

टी-20:संभाव्य भारतीय संघ- हार्दिक पंड्या (C), सुर्यकुमार यादव (VC), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार हेही वाचा: Rohit Sharma Fan(45): चाहत्याने पाठीवर गोंदवले रोहितचे विक्रम !

भारत आणि श्रीलंका(India Vs Srilanka यांच्यात टी-20 मालिका झाल्यानंतर लगेच 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात या मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारीला गुवाहाटी, 12 जानेवारीला कोलकाता, तर तिसरा वनडे सामना 15 जानेवारीला तिरुअनंतपुरम येथे होईल.

वनडे: संभाव्य भारतीय संघ- रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह

Comments are closed.