
Last Updated on February 15, 2023 by Jyoti S.
Indian Cricket Team -1 टीम: टीम इंडियाने असा विक्रम केला
थोडं पण महत्वाचं
जो भारतीय क्रिकेट टीमच्या इतिहासात कधीही पाहिला नाही. आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
New delhi : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीनंतर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत टीम इंडिया कसोटीत(Indian Cricket Team) अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारतीय संघाची ही कामगिरी ऐतिहासिक आहे कारण सध्या भारतीय संघ टी-20 आणि वनडेमध्येही अव्वल स्थानावर आहे. आता कसोटीच्या आधारे भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आयसीसीच्या तिन्ही क्रमवारीत एकाच वेळी एका संघाने अव्वल स्थान पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली भारताने हा नवा इतिहास रचला आहे. सध्या, रोहित शर्मा एकदिवसीय आणि कसोटीत नेतृत्व करत आहे तर हार्दिक टी-20 मध्ये आघाडीवर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दर बुधवारी ताज्या क्रमवारीची घोषणा केली जाते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीनंतर प्रथमच क्रमवारी अपडेट करण्यात आली असून त्याचा फायदा टीम इंडियाला मिळाला आहे. कसोटीत भारताचे रेटिंग ११५ आहे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे रेटिंग १११ आहे.
कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ वनडे(Indian Cricket Team) आणि टी-२० मध्ये अव्वल स्थानावर होता. टीम इंडियाने नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 डाव आणि 132 धावांनी दणदणीत विजय नोंदवला आणि कसोटी सामन्यांमध्येही अव्वल स्थान पटकावले.
भारतीय संघ 1973 मध्ये प्रथमच कसोटीत अव्वल स्थानी पोहोचला होता. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजेच 2009 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारत कसोटीत अव्वल स्थानावर पोहोचला. 2011 पर्यंत भारत कसोटीत अव्वल होता. 2016 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा अव्वल स्थान मिळवले तेव्हा एप्रिल 2020 पर्यंत टीम इंडिया पहिल्या स्थानावर होती. तेव्हापासून भारत नेहमीच टॉप 3 मध्ये राहिला आहे आणि आता पुन्हा नंबर 1 स्थान मिळवले आहे.
खेळाडूंनाही फायदा झाला
नागपूर कसोटीतील चमकदार कामगिरीचा फायदा संघालाच नव्हे तर भारतीय खेळाडूंनाही झाला आहे. नागपूर कसोटीत शतक झळकावणारा रोहित शर्मा फलंदाजांच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. ऋषभ पंत सातव्या स्थानावर आहे. गोलंदाजीत आर अश्विन नागपूर कसोटीत ८ विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा पहिल्या तर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा: 2023 WPL Auction : स्मृती मानधना RCB च्या संघात; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली बघा