INDvsAUS Test: भारत दौऱ्यात सराव सामने नको- मॅकडोनाल्ड

Last Updated on January 2, 2023 by Taluka Post

INDvsAUS Test: भारत दौऱ्यात सराव सामने नको- मॅकडोनाल्ड

?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

सिडनी : विदेशातील दौऱ्यात सराव सामने न खेळण्याची रणनीती आगामी भारत दौऱ्यातही उपयोगाची ठरेल. त्यामुळे फ्रेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला सराव सामन्यांची गरज नाही, असे मत मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी व्यक्त केले आहे.

१९ फेब्रुवारीला नागपूर कसोटीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विदेशात सराव सामने न खेळण्याच्या रणनीतीवर ऑस्ट्रेलियाने ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालिका सुरू होण्याच्या एक आठवडा आधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल होईल.

आपल्या विधानाचे स्पष्टीकरण देताना मॅकडोनाल्ड म्हणाले, परिस्थिती आणि खेळपट्ट्यांशी जळवन घेण्यासाठी सराव सामने खेळण्यापेक्षा खेळाडूंचे ताजेतवाने राहणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे गेल्या काही विदेशातील मालिकांमध्ये आम्ही सराव सामने खेळणे टाळले होते. आमच्या संघालासुद्धा सराव सामन्यांची गरज नाही.

हेही वाचा: India Vs Srilanka : आता श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि वनडे सीरिज, ‘असा’ असेल भारतीय संघ..

Comments are closed.