Last Updated on December 23, 2022 by Jyoti S.
IPL 2023 Auction : सॅम कुरन आयपीएल 2023 च्या लिलावात 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह आला होता.
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करणने 23 डिसेंबर रोजी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 Auction ) लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कोची येथे सुरू असलेल्या IPL 2023 च्या लिलावापूर्वी, अनेक पंडितांनी करणवर यावेळी पैशांचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता आणि तो पुन्हा एकदा विक्रमी किमतीत पंजाब किंग्ज (PBKS) मध्ये सामील झाला.
आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
पंजाब किंग्स (PBKS) ने IPL 2023 च्या लिलावात 18.5 कोटी रुपये खर्च करून 24 वर्षीय इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूला आगामी हंगामासाठी त्यांच्या संघात विकत घेतले आहे. सॅम कुरन हा आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा क्रिकेटपटू बनला आहे आणि त्याचे श्रेय त्याच्या अलीकडील अप्रतिम फॉर्मला जाते.

सॅम करण पुन्हा एकदा आयपीएलमध्ये(IPL 2023 Auction) पंजाब किंग्जसाठी अॅक्शन करताना दिसणार आहे
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स यांच्यात सॅम करणसाठी चुरशीची लढत झाली, पण ही रक्कम 11.50 कोटींवर पोहोचताच पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जही या लढतीत सामील झाले. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सनेही करणवर सट्टा लावला, पण शेवटी पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांच्या किमतीत त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यात यश मिळवले. तो लिलावात 2 कोटींची मूळ किंमत घेऊन आला होता.हेही वाचा: IPL Auction-2023 : कॅमेरून ग्रीनला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपये खर्च केले
आम्ही तुम्हाला सांगतो की, करणची T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड झाली होती. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) कडून खेळला आहे. मागील वर्षी पाठीच्या दुखापतीमुळे तो आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाचा भाग होऊ शकला नव्हता, परंतु यावेळी तो रेकॉर्डब्रेक करोडपती बनला आहे.
जर आपण आयपीएलमधील सॅम कुरनच्या आकडेवारीवर नजर टाकली तर इंग्लंडच्या युवा स्टार अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत 32 सामन्यांमध्ये 149 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 337 धावा केल्या आहेत आणि 32 विकेट्सही घेतल्या आहेत.