IPL 2023 news : पंत ते बुमराह, ‘हे’ स्टार खेळाडू आता आयपीएलला मुकणार,पहा संपूर्ण यादी सविस्तर

Last Updated on March 15, 2023 by Jyoti S.

IPL 2023 news

आयपीएल 2023(IPL 2023 news) : आयपीएलच्या आगामी हंगामाला आता फक्त दोन आठवडे उरले आहेत. प्रत्येक संघाने तयारी सुरू केली आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये काही स्टार खेळाडूंची उणीव भासू शकते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

यामध्ये आता दिल्लीचा(IPL 2023 news) कर्णधार ऋषभ पंत, मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा देखील समावेश आहे. याशिवाय आणखी काही स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर होण्याची शक्यता आहे. त्याची सविस्तर माहिती पाहूया.

ऋषभ पंत –

2022 च्या अखेरीस यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसोबत एक भयानक अपघात झाला. या अपघातात पंत थोडक्यात बचावले. पंत यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर असण्याची शक्यता आहे. पंतला अजूनही आपल्या पायावर उभे राहता आलेले नाही. त्यामुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकणार आहे. ऋषभ पंतची अनुपस्थिती दिल्लीसाठी मोठा धोका मानला जात आहे.

हेही वाचा: WPL 2023 : महिला क्रिकेटपटूंनाही आता शाहरुखच्या ‘पठान’चे वेड; भर मैदानातच…

जसप्रीत बुमराह-

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. जसप्रीत बुमराह गेल्या सात ते आठ महिन्यांपासून दुखापतग्रस्त आहे. नुकतीच त्यांच्यावर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली. सध्या तो दुखापतीतून सावरत आहे. जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये न खेळल्याने मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर खेळणार ही मुंबईसाठी दिलासादायक बाब आहे.

श्रेयस अय्यर –

श्रेयस अय्यरच्या आयपीएल 2023 मध्ये खेळण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अहमदाबाद कसोटीतही श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आला नव्हता. तेव्हापासून श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत सातत्याने चर्चा होत आहे. अय्यरच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिका आणि आयपीएलमध्ये खेळणार का? ते पाहिले जाते. अय्यरची आयपीएलमधून बाहेर पडणे कोलकातासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा: पराभवानंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचले पहा व्हिडीओ

स्टीव्ह स्मिथ-

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. स्मिथने आता तेथील कामाचा ताण पाहता त्याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल लिलावातही स्मिथचे नाव नव्हते.त्याचमुळे आता स्मिथ यंदा आयपीएलमध्ये आपल्याला खेळताना दिसणार नाही.

पॅट कमिन्स-


ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यंदाच्या आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले आहे. पॅट कमिन्सने कामाचा ताण लक्षात घेऊन आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पण कोलकाताने लॉकी फर्ग्युसनला आणून डोकेदुखी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रसिद्ध कृष्णा


प्रसिद्ध कृष्णा गेल्या काही दिवसांपासून दुखापतींशी झुंज देत आहे. प्रसिद्ध कृष्ण पाठदुखीने त्रस्त आहे. यातून तो अजूनही सावरलेला नाही, त्यामुळे त्याने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. राजस्थानसाठी हा त्याचा मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा: 2023 WPL Auction : स्मृती मानधना RCB च्या संघात; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली बघा

काइल जेमिसन


न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसननेही आयपीएलमधून माघार घेतली आहे. जेमिसन दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळणार नाही. चेन्नईसाठी हा धक्का मानला जात आहे.

जे रिचर्डसन –


जसप्रीत बुमराहनंतर मुंबईचा जे रिचर्डसनही आयपीएलमधून बाहेर होणार आहे. दुखापतीमुळे रिचर्डसनने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जॉनी बेअरस्टो-


पंजाबचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टो या हंगामात खेळेल का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंजाब किंग्जचा हा फलंदाज जॉनी बेअरस्टो इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ECB) वैद्यकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेतच. तसेच गेल्या वर्षी झालेल्या दुखापतीतून सावरत आहे.