Rohit Sharma Fan(45): चाहत्याने पाठीवर गोंदवले रोहितचे विक्रम !

Last Updated on December 27, 2022 by Taluka Post

Rohit Sharma Fan: चाहत्याने पाठीवर गोंदवले रोहितचे विक्रम ! ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

दिल्ली: भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि क्रिकेटपटू हा देवासारखाच असतो. याची अनेक उदाहरणे(Example) आहेत आणि अशा गोष्टी प्रत्येक दशकात वेगवेगळ्या खेळाडूंच्या बाबतीत समोर येत राहतात. चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंसाठी काहीही करू शकतात. अशातच कर्णधार रोहित शर्माच्या एका चाहत्याने(Rohit Sharma Fan) काहीतरी अनोखे करून दाखवले आहे.

या चाहत्याने आपल्या शरीरावर रोहितचे नाव आणि जर्सी नंबर मोठ्या अक्षरात गोंदवला आहे. तसेच त्याचे विक्रमही गोंदवले आहेत. रोहितच्या वनडेमधील तीन द्विशतकांपासून ते टी-२० मधील चार शतकांपर्यंत या चाहत्याने सारे विक्रम पाठीवर टैटू स्वरूपात गोंदवून ठेवले. रोहितने टी-२० मध्ये कोणत्या देशांविरुद्ध शतक केले आणि त्या डावात किती धावा केल्या, हेही त्याने पाठीवर टॅटूसारखे गोंदले आहे. रोहितच्या(Rohit) या चाहत्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IPL 2023 Auction : सॅम करणने लिलावात सर्व जुने रेकॉर्ड तोडले!!18.5 कोटी रुपये खर्च.

Comments are closed.